विकासाचा अनुशेष भरण्यासाठी ‘कोकण विकास प्राधिकरण’

Maharashtra assembly poll | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; सावंतवाडी येथे महायुतीसाठी प्रचार सभा
Konkan Development Authority
सावंतवाडी ः प्रचारसभेत बोलताना एकनाथ शिंदे. सोबत खा. नारायण राणे, दीपक केसरकर, नीलेश राणे, पल्लवी केसरकर व अन्य.pudhari photo
Published on: 
Updated on: 

सावंतवाडी ः कोकणच्या पर्यटन विकासाला चालना मिळावी म्हणून आमच्या सरकारने ‘कोकण एक्स्प्रेस वे’ ला चालना दिली आहे. मुंबई ते गोवा असा हा सुपर एक्स्प्रेस हायवे होणार असून सिंधुदुर्गवासीय चाकरमानी केवळ चार ते पाच तासांत गावात येणार आहेत. त्याचबरोबर कोकणच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आम्ही कोकण विकास प्राधिकरण स्थापन करत आहोत. कोकणात बारमाही शेती झाली पाहिजे, यासाठी गावागावांत छोटे-छोटे बंधारे बांधण्याचे काम हाती घेणार आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंतवाडी येथे केले.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिंदे शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर व कुडाळ मतदारसंघातील उमेदवार नीलेश राणे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सावंतवाडीत जाहीर सभा झाली.

यावेळी खा. नारायण राणे, उमेदवार दीपक केसरकर, नीलेश राणे, शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना उपनेते संजय आग्रे, महेश सारंग, नीता सावंत-कविटकर, श्वेता कोरगावकर, नितीन मांजरेकर, रिपाइंचे रमाकांत जाधव, संजू परब, तालुका प्रमुख नारायण ऊर्फ बबन राणे, अजित पवार राष्ट्रवादीचे काका कुडाळकर, सुरेश गवस, संदीप कुडतरकर, दत्ता सामंत, पल्लवी केसरकर आदींसह शिवसेना आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे हा आंदोलनातून मोठा झालेला कार्यकर्ता आहे. तो तुमच्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही. मला हलक्यामध्ये घेतले म्हणून तुमचा टांगा पलटी करून टाकला आणि सरकार बदलून टाकले, असा टोला त्यांनी लगावला. काही लोक नुसते फोटोग्राफी करत व सकाळपासून शिव्याशाप देत फिरतात. ही निवडणूक झाली की त्यांना कॅमेरा गळ्यात अडकवून जंगलातच फोटोग्राफी करण्यासाठी जावे लागणार आहे, अशी खिल्ली त्यांनी उडवली. (Maharashtra assembly poll)

मी आरोपांना कामाने उत्तर देतो. आमचे सरकार हप्ते घेणारे नाही, तर लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारे आहे. मविआचे ‘कपटी भाऊ’ आडवे येतील म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचा हप्ता जमा केला. आता डिसेंबरचे पैसेही तुमच्या खात्यात जमा होेतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. लाडक्या बहिणीला यापुढे 2100 रुपये देण्याचे अभिवचन दिले आहे. महिला पोलिस भरती, वृद्धांना पेन्शन, जीवनावश्यक वस्तूंचे स्थिर भाव, चार लाख युवकांना जर्मनीत नोकर्‍या, अंगणवाडी व आशा सेविकांना 15 हजार रुपये, शेतपंपांची 30 टक्के वीज माफी असे काही महायुती सरकारचे जनताभिमुख निर्णय त्यांनी सांगितले.

दीपक केसरकर म्हणाले, गेल्या 15 वर्षांत मी काय केले असा प्रश्न आपणास विचारला जातो. मी मतदारसंघात 2500 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी आणला आहे. राणेंनी शिवसेना सोडली तो काळ आठवा. मी शिवसेनेत आल्यानंतर एक लाखावर मते गेली. वित्त राज्यमंत्री असताना आठवेळा मी राज्याचे बजेट मांडले. मल्टिस्पेशालिटीसाठी ठाकरेेंनी नाही तर तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी निधी दिल्याचे त्यांनी सांगितले. (Maharashtra assembly poll)

खा. नारायण राणे म्हणाले, येथील महायुतीच्या उमेदवाराचे कार्य, योगदान पहा व मतदान करा. महायुतीचे उमेदवार केसरकर यांचे मतदारसंघात मोठे सामाजिक, शैक्षणिक काम आहे. यावेळी त्यांनी विरोधी उमेदवार राजन तेली व विशाल परब यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला.

केसरकर आमचे सचिन तेंडुलकर!

दीपक केसरकर म्हणजे शिंदे शिवसेनेतील सचिन तेंडुलकर आहेत. ते ऑल राऊंडर व फायर फायटर आहेत. ते अभिमन्यूसारखे काम करतात. चक्रव्यूह कसा भेदायचा हे त्यांना ठाऊक आहे, असे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केसरकरांचे केले. केसरकर व राणे एकत्र आले हा विजयाचा शुभ शकून आहे. नितेश राणे व नीलेश राणे यांनाही मोठे लीड मिळेल. कारण ‘बापसे बेटा सवाई’ अशा शब्दात त्यांनी कौतुक केले. नारायण राणेंचा आशीर्वाद नीलेशच्या पाठीशी आहे, त्यामुळे नीलेशचा विजय पक्का आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news