

सिंधुदुर्ग : गेल्या 13 ऑक्टोबर रोजी मान्सुनने भारतातून एक्झीट घेतली असली तरी अवकाळी पावसाने दक्षिण भारत आणि कोकणचा पिच्छा काही सोडलेला दिसत नाही.
ऐन दिवाळीत अधूनमधून सरीने कोसळणार्या या अवकाळी पावसाने भात कापणीसाठी तयार असलेल्या शेतकर्याला त्रस्त केले आहे. त्याचवेळी समुद्रात मासेमारीसाठी जाणार्या मच्छीमारासमोरही अडचण निर्माण केली आहे. त्यात पुन्हा पर्यटनाचा ऐन हंगाम सुरू झाला असताना पावसाच्या भीतीपोटी पर्यटकांनीही सावधगिरीची भूमिका म्हणून किनार्याकडे पाठ फिरवली आहे.