

कणकवली : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. ११ ते २७ सप्टेंबर कालावधीत या गाड्या धावणार आहेत. त्यामुळे विविध प्रवासी संघटनांनी सतत केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. गणेशोत्सवात केवळ कोकणासाठी या मर्यादित विशेष गाड्या सोडण्याच्या मागणीला मोठे यश मिळाले आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गणेशोत्सव विशेष गाड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यात सावंतवाडी रोड स्थानकासाठी एकूण ५६+५६ टर्मिनेटिंग फेऱ्या मंजूर करण्यात आल्या आहेत. यामध्ये ट्रेन क्र. ०११०३-०४ (मुंबई CSMT - सावंतवाडी रोड - CSMT दैनिक) हा गाडी ११ ते २६ सप्टेंबर (CSMT कडून) आणि १२ ते २७ सप्टेंबर (सावंतवाडी कडून) धावणार आहे. प्रत्येकी १६ फेऱ्या आहेत.
ट्रेन क्र. ०११२९-३० (लोकमान्य टिळक टर्मिनस - सावंतवाडी रोड साप्ताहिक) ही गाडी १५ व २२ सप्टेंबर रोजी धावणार आहे. ट्रेन क्र. ०११५१-५२ (मुंबई CSMT - सावंतवाडी रोड - CSMT दैनिक) ही गाडी ११ ते २७ सप्टेंबर या कालावधीत धावणार असून प्रत्येकी १७ फेऱ्या आहेत. ट्रेन क्र. ०११७१-७२ (LTT - सावंतवाडी रोड - LTT दैनिक) ही गाडी ११ ते २७ सप्टेंबर या कालावधीत धावणार आहे. ट्रेन क्र. ०११३१-३२ सावंतवाडी रोड - LTT द्वि साप्ताहिक गाडीच्या गुरुवार व रविवार अशा प्रत्येकी ४ फेऱ्या होणार आहेत.
ट्रेन क्र. ०११५३-५४ (मुंबई CSMT - रत्नागिरी - CSMT दैनिक) ही गाडी ११ ते २६ सप्टेंबर (CSMT कडून) आणि १२ ते २७ सप्टेंबर (रत्नागिरी कडून) प्रत्येकी १६ फेऱ्या होणार आहेत. ट्रेन क्र. ०११६७-६८ (LTT - रत्नागिरी - LTT आठवड्यातून ५ दिवस) ही गाडी ११ ते २६ सप्टेंबर (LTT कडून: मंगळ, बुध, गुरु, शनि, रवि) आणि १२ ते २७ सप्टेंबर (रत्नागिरी कडून) - प्रत्येकी ११ फेऱ्या आहेत. ट्रेन क्र. ०१४४५-४६ (पुणे - रत्नागिरी - पुणे साप्ताहिक) ही गाडी १५ आणि २२ सप्टेंबर रोजी धावणार आहे. (प्रत्येकी २ फेऱ्या). ट्रेन क्र. ०१४४७-४८ (पुणे - रत्नागिरी - पुणे साप्ताहिक) ही गाडी १२, १९ आणि २६ सप्टेंबर रोजी धावणार आहे.
ट्रेन क्र. ०११३३-३४ (दिवा - चिपळूण - दिवा मेमू स्पेशल दैनिक) ही गाडी ११ ते २६ सप्टेंबर (दिवा येथून - २३ सप्टें रोजी सेवा बंद) आणि १२ ते २७ सप्टेंबर (चिपळूण येथून - २४ सप्टें रोजी सेवा बंद) - प्रत्येकी १५ फेऱ्या आहेत.
ट्रेन क्र. ०११५५-५६ (दिवा - खेड - दिवा मेमू स्पेशल दैनिक) गाडी ११ ते २७ सप्टेंबर (२२ सप्टेंबर रोजी दोन्ही बाजूने सेवा बंद राहील) - प्रत्येकी १६ फेऱ्या.
ट्रेन क्र. ०११६५-६६ (LTT - मडगाव - LTT साप्ताहिक) ही गाडी १५ आणि २२ सप्टेंबर रोजी धावणार आहे. (प्रत्येकी २ फेऱ्या) व ट्रेन क्र. ०११८५-८६ (LTT - मडगाव - LTT साप्ताहिक) ही गाडी १६ आणि २३ सप्टेंबर (प्रत्येकी २ फेऱ्या) रोजी धावणार आहेत.
कोकणातील वाढती गर्दी आणि प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता सावंतवाडी येथे स्वतंत्र रेल्वे टर्मिनसची तीव्र गरज पुन्हा एकदा स्पष्टपणे अधोरेखित झाली आहे. भविष्यात सावंतवाडी टर्मिनस झाल्यास कोकणवासीयांच्या प्रवासाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकेल.