

,, , , , , Kankavli crime news,
Meta Slug (in English):
kankavli-two-cars-same-number-fir-against-owners
हवे असल्यास मी यासाठी meta description किंवा मराठी मेटा माहिती देखील तयार करू शकतो.
कणकवली : कणकवली शहरातील विद्यानगर आणि तहसिल कार्यालय परिसरात एकाच नंबरच्या दोन व्हॅगनार कार आढळून आल्या. पोलिसांकडे आलेल्या निनावी तक्रारीनंतर कणकवली पोलिसांनी सदरच्या दोन्ही गाड्या पोलिस स्थानकात आणून आरटीओ मार्फत चौकशी सूरू केली.
दरम्यान संबंधित दोन्ही कार चालकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती पोलिस निरीक्षक मारूती जगताप यांनी दिली. मात्र कार शोरूम मधून बाहेर पडताना पार्सिंग करूनच बाहेर पडत असल्याने या कारला नंबर मिळाला नाही कसा? याबाबतचे गौडबंगाल काय? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
कणकवली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार कणकवली तहसील कार्यालयात सहायक महसूल अधिकारी पदावर कार्यरत असलेले सत्यवान भगवान माळवे (42) यांच्या मालकीची व्हॅगनार कार असून तिचा क्रमांक एमएच07-एजी 8533 असा आहे. ते कणकवलीत डिचोलकर कॉम्प्लेक्स विद्यानगर येथे राहतात. तर कणकवलीतच राहणारे नाधवडे येथील जि.प. शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले विनोद विठ्ठल खंडागळे यांच्याकडे असलेल्या कारलाही एमएच07-एजी 8533 ही नंबर प्लेट असल्याचे दिसून आले होते.
दोन्ही गाड्यांचे नंबर एकच असल्याने निनावी तक्रारीनंतर या गाड्या गुरुवारी रात्री कणकवली पोलिस स्थानकात आणण्यात आल्या. सदर प्रकाराबाबत आरटीओला कळवण्यात आले होते. दोन्ही कारमालक हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तर एमएच07-एजी 8533 हा नंबर सत्यवान माळवे यांच्याच कारचा आहे, मग तोच नंबर श्री. खंडागळे यांनी आपल्या कारसाठी कसा काय वापरला?
या मागचे गौडबंगाल काय? असे प्रश्न निर्माण झाले होते. दरम्यान, याप्रकरणी पोलीसांनी तपासाअंती दोन्ही कार मालकांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू केल्याचे पोलिस निरीक्षक श्री. जगताप यांनी सांगितले.