

कणकवली : राज्याचे कॅबिनेटमंत्री भरत गोगावले हे नेहमीच परखड बोलतात. पोटात एक व ओटावर दुसरे अशी त्यांची भुमिका नसते. गेली अनेक वर्षे ते विधानसभेचे सदस्य राहिले आहेत. मीसुध्दा त्यांच्याबरोबर सहकारी म्हणून काम केले आहे.
खा.राणे यांनी आपली संघटना आतापर्यंत अशा प्रकारच्या दडपशाहीनेच वाढवलेली आहे. माझा मंत्री गोगावले यांना एवढाच प्रश्न आहे, तुम्ही शिंदे शिवसेना बळकटीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आला होता.
मग तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांनाही नारायण राणे यांच्या स्टाईलनेच पक्ष वाढविण्याचा सल्ला दिला आहे का? असा सवाल ठाकरे शिवसेनेचे नेते, माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.