Sindhudurg News : कणकवलीत 6 हजारांचा गुटखा जप्त

पोलिसांच्या कारवाईने गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले
gutkha seizure
कणकवलीत 6 हजारांचा गुटखा जप्त pudhari photo
Published on
Updated on

कणकवली ः कणकवली शहरात सुहास पान सेंटर जवळ टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी तब्बल 5 हजार 990 रुपयांचा विमल कंपनीचा गुटखा जप्त केला. कणकवली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई शुक्रवारी केली.

याप्रकरणी पोलिसांनी संशयित सुनील प्रभाकर परब याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार सुहास पान सेंटर च्या बाजूला विमल कंपनीचा गुटखा असल्याबाबतची खबर पोलिसांना लागली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. ही कारवाई कणकवली पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार विनोद चव्हाण, स्वप्निल ठोंबरे, सचिन माने, अपर्णा होवाळे यांच्या पथकाने केली. संशयित आरोपीवर बेकायदेशीर विक्री करता गुटखा बाळगल्याप्रकरणी अन्नसुरक्षा व मानके अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news