

कणकवली : नारळी पौर्णिमेनिमित्त शुक्रवारी सायंकाळी पोलिसांकडून परंपरेप्रमाणे जानवली गणपती साना येथे प्रतिकात्मक सोन्याचा मानाचा नारळ नदीत अर्पण करण्यात आला. कणकवलीसह जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहू दे, जिल्हावासीयांना सुख, समृद्धी लाभू दे अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
यावेळी पोलिस उपनिरीक्षक वैशाली बर्गे, पोलिस हवालदार पांडुरंग पांढरे, महिला पोलिस हवालदार स्मिता पवार, श्रीमती गुरव यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते. जानवली गणपती साना येथे प्रतिकात्मक सोन्याच्या नारळाचे पूजन करून नदीला नारळ अर्पण करण्यात आला.