Sindhudurg news : एकदिलाने काम करणार असाल तरच निवडणूक लढवेन!

संदेश पारकर यांनी ‘मविआ’च्या बैठकीत मांडली भूमिका
Sindhudurg news
संदेश पारकर
Published on
Updated on

कणकवली ः कणकवली नगरपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर मंगळवारी ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी सर्वच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संदेश पारकर यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला. यावर संदेश पारकर यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतल्यानंतर सर्वजण एकदिलाने, एकजूटीने निवडणूक लढविणार असाल, सतराही प्रभागात जे उमेदवार निश्चित होतील त्या सर्वांमध्ये एकवाक्यता असेल तरच मी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवेन अशी भूमिका मांडली. त्यामुळे भाजप विरोधात मविआ किंवा शहर विकास आघाडी होत असेल तर त्याचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर हेच असतील हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल डेगवेकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, कन्हैया पारकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, राष्ट्रवादीचे संदेश मयेकर, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी, युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, संकेत नाईक, उमेश वाळके, योगेश मुंज, सोहम वाळके, जयेश धुमाळे, सोमा गायकवाड, सुशील आळवे, तेजस राणे, सुदीप कांबळे, सुजित जाधव, दादा परब, दिव्या साळगावकर, सी. आर. चव्हाण, अविनाश सावंत, वैभव मालंडकर, आदित्य सापळे, सुशील आळवे, जय शेटये, सोमा गायकवाड यांच्यासह आदी उपस्थित होते.

कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यामुळे कणकवली न.पं. निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून रणनिती आखली जात आहे. तसेच संभाव्य उमेदवारांची चाचपणीही सूरू आहे. या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडीची ही महत्वाची बैठक झाली. अर्थात कणकवलीत शहर विकास आघाडी स्थापन करण्याबाबतही चर्चा सुूरू आहे. त्याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. जर शहर विकास आघाडी स्थापन झाली तर शिंदे शिवसेना शहर विकास आघाडीत सहभागी होणार का? याबाबतही सस्पेन्स कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news