Sindhudurg News : इंधनटंचाईच्या भीतीने वाहनचालक धास्तावले!

कणकवलीत पेट्रोल पंपांवर शुकशुकाट; इंधनासाठी वाहनचालकांच्या रांगाच रांगा
Sindhudurg News
कणकवली ः जिल्ह्यातील अनेक पंपांवर पेट्रोल, डिझेल नसल्याने असा शुकशुकाट होता.
Published on
Updated on

कणकवली ः आखाती देशांतील युद्धामुळे एकीकडे गॅसटंचाई निर्माण झाली असताना दुसरीकडे डिझेल, पेट्रोलच्या टंचाईमुळेही वाहन चालकांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण आहे. गुरुवारी दिवसभर कणकवलीसह जिल्ह्यातील अनेक पंप पेट्रोल, डिझेल नसल्याने बंद होते. त्यामुळे धास्तावलेल्या वाहनचालकांनी साठा उपलब्ध असलेल्या पेट्रोल पंपांवर धाव घेतली होती. त्यामुळे या पंपांवर वाहन चालकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

जिल्हा प्रशासनाकडून जरी डिझेल, पेट्रोलचा पुरेसा साठा असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. अर्थात टंचाईच्या भीतीने वाहन चालक नियमित मागणीपेक्षा अधिकचे पेट्रोल, डिझेल भरत असल्याने त्याचा परिणाम काही प्रमाणात झाला आहे. त्यामुळे पंपांवरील पेट्रोल, डिझेलचा साठा लवकर संपत आहे. त्या तुलनेत पुरवठा मात्र गतीने होताना दिसत नाही. त्यामुळे वाहन चालक सावध बनले असून, अधिकचे पेट्रोल, डिझेल भरू लागले आहेत.

रात्रीपर्यंत पुरवठा सुरळीत होण्याचा अंदाज

याबाबत महसूल प्रशासनाशी संपर्क साधला असता, अनेक पंपांवर पेट्रोल, डिझेल नसल्याचे सांगण्यात आले. परंतु, रात्रीपर्यंत टँकर जिल्ह्यात येतील आणि पेट्रोल, डिझेल साठा सुरळीत होईल, असे सांगण्यात आले. एकीकडे गॅसटंचाईमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली असताना आता डिझेल, पेट्रोलच्या टंचाईने या त्रासात आणखी भर पडणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news