

कणकवली : कणकवली नगरपंचायतच्या वतीने शहरातील उड्डाणपुलाखाली बसविण्यात आलेल्या सेल्फ क्लिनिंग ऑटोमेटेड इ-टॉयलेटचे लोकार्पण सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, मुख्याधिकारी गौरी पाटील, माजी नगराध्यक्ष किशोर राणे, माजी नगरसेवक संजय कामतेकर, माजी नगरसेविका मेघा गांगण, प्रद्युम्न मुंज, अमोल अघम, न.पं. कर्मचारी अमोल भोगले, प्रशांत राणे, सचिन नेरकर, वैभव करंदीकर, रवी महाडेश्वर, ध्वजा उचले, संदीप मुसळे, व्यापारी मंदार सापळे, अॅड. दीपक अंधारी आदी उपस्थित होते.