Kankavali ZP Election : कणकवलीत जि.प.साठी 13 तर पं.स. साठी 26 उमेदवार रिंगणात

अंतिम दिवशी 37 अर्ज मागे ः पं.स.च्या चार जागा बिनविरोध
Kankavali ZP Election
कणकवलीत जि.प.साठी 13 तर पं.स. साठी 26 उमेदवार रिंगणात
Published on
Updated on

कणकवली ः कणकवली तालुक्यात जि. प., पं. स. साठी उमेदवारी अर्ज दाखल 34 उमेदवारांनी त्यांचे 37 अर्ज मागे घेतले त्यामुळे जि.प.च्या 6 जागांसाठी 13 तर पं.स.च्या 10 जागांसाठी 26 उमेदवार रिंगणात आहेत. जि.प.साठी फोंडाघाटमध्ये तिरंगी तर अन्य ठिकाणी दुरंगी लढती होणार आहे. पं.स.मध्येही बहुतांशी ठिकाणी दुरंगी लढती होणार आहेत. मंगळवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी पं.स.च्या चार जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. नाटळ, हरकुळ बु. गटात भाजपच्या उमेदवारांनी आपले अपक्ष अर्ज मागे घेतले मात्र फोंडाघाट गटातून भाजपचे अपक्ष उमेदवार राजन चिके यांनी आपली बंडखोरी कायम ठेवली आहे.

मंगळवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असल्याचे तहसील कार्यालयात उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. कोणकोणते उमेदवार अर्ज मागे घेणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. बुधवारी भाजपचे चार पं.स.गणाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले त्यात नांदगाव गणातून हर्षदा वाळके, नाटळ गणातून सायली ृपाळ, हरकुळ बु. गणातून दिव्या पेडणेकर आणि जानवली गणातून महेश्वरी चव्हाण यांचा समावेश आहे. मंगळवारी देवेंद्र पिळणकर- फोंडाघाट गट (राष्ट्रवादी श. प. गट), धीरज मेस्त्री-कलमठ गण. (उबाठा), नितीन मेस्त्री- कलमठ गण(अपक्ष), धनश्री मेस्त्री- कलमठ, नांदगाव नाटळ गण (उबाठा), वैष्णवी सुतार- नाटळ गण(अपक्ष),नीरज मोर्ये-कासार्डे गट (अपक्ष), मनीषा राणे-लोरे गण (अपक्ष), प्राची मोर्ये-नांदगाव गण (अपक्ष), समृद्धी सावंत-ओसरगाव गण (अपक्ष), शुभदा देसाई- कळसुली गट (अपक्ष), मंगेश गुरव-खारेपाटण गण (उबाठा), संतोष कानडे- हरकुळ बु. गट (अपक्ष), संतोष कानडे-फोंडा गट (अपक्ष), प्रथमेश सावंत- हरकुळ बु. गट (अपक्ष), नेहा कुलकर्णी- ओसरगाव गण (अपक्ष), अंकिता आमडोसकर-कळसुली गट(अपक्ष), विजय चिंदरकर-कलमठ गण(अपक्ष), अनंत राणे- कळसुली गण (उबाठा), राजन नानचे -फोंडा गट(अपक्ष),ध्रुवबाळ गोसावी-फोंडा गण(अपक्ष), संजय नकाशे- कासार्डे गण (अपक्ष), रमाकांत राऊत- खारेपाटण गण (अपक्ष), सायली तोरसकर - हरकुळ बु.गण.(डमी), निवृत्ती पवार-तळेरे गण (अपक्ष), संजना सावंत-नाटळ व हरकुळ बु.गट (अपक्ष), संदेश सावंत-हरकुळ बु. गट (अपक्ष), सुरेश सावंत- हरकुळ बु. व नाटळ गट (अपक्ष), नेहा चिंदरकर- हरकुळ बु. गण (अपक्ष), वैदेही तायशेटे- हरकुळ बु.गण (अपक्ष), हेलन कांबळे-जानवली गण (अपक्ष), मंगेश सावंत- हरकुळ बु. गट (उबाठा), प्रितम मोर्ये- हरकुळ बु. गट (अपक्ष) या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news