प्रवासी महिलेच्या पर्स मधून दागिने चोरीस

Travel theft: सावंतवाडी एसटी स्थानकातील घटना
Sindhudurg Theft News
प्रवासी महिलेच्या पर्स मधून दागिने चोरीसFile Photo
Published on
Updated on

सावंतवाडी ःकुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूर ते दाणोली येथे भाच्याच्या लग्नाला जाणार्‍या हर्षदा हरी लाड (42) या महिलेच्या पर्समधील पाच तोळ्याचे मंगळसूत्र आणि एक तोळ्याचा हार असे एकूण चार लाखाचे दागिने अज्ञाताने चोरल्याचा प्रकार गुरुवारी सावंतवाडी बस स्थानकात दुपारी 2 वा.च्या सुमारास घडला. याबाबत सौ.लाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाता विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौ.लाड या आपली बहिण व मुलगी यांच्या समवेत दाणोली येथे भाच्याच्या लग्नासाठी जाण्याकरता कुडाळवरून सावंतवाडी बस स्थानकात आल्या होत्या. त्यांनी आपल्या सोबत मंगळसूत्र व हार घेतला होता, तो पर्समध्ये प्लॅस्टिक डबीमध्ये ठेवला होता.

दु.2 वा. त्या सावंतवाडी बस स्थानकातून दाणोली येथे जाण्यासाठी त्या कोल्हापूर -नृसिंहवाडी बसमध्ये चढल्या मात्र उपरलकर देवस्थान येथे गेल्यानंतर त्यांना आपल्या पर्सची चेन उघडी दिसली, म्हणून त्यांनी दागिन्याची खात्री केली असता आतमधील मंगळसूत्र आणि हार असलेली डबी दिसून आली नाही. त्यांनी तात्काळ गाडी थांबवली एसटी माघारी सावंतवाडी पोलीस ठाण्यात नेली. मात्र हार व मंगळसूत्र सापडून आले नाही.

सौ.लाड यांच्या म्हणण्यानुसार सावंतवाडी बस स्थानकात कोल्हापूर- नृसिंहवाडी गाडीमध्ये चढत असताना दोन बुरखादारी महिला आतमध्ये चढल्या आणि तात्काळ पुन्हा खाली उतरल्या. संबंधित महिलांनीच ही चोरी केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news