सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कूबा डायव्हिंग केंद्र

800 स्थानिकांना मिळणार रोजगार
सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कूबा डायव्हिंग केंद्र
सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कूबा डायव्हिंग केंद्रPudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई : कोकणात सागरी पर्यटन वाढविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कूबा डायव्हिंग केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 20 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यामधून 800 स्थानिक युवकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. वेंगुर्ला येथे 66 कोटी रुपयांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणबुडी प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे.

सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कूबा डायव्हिंग केंद्र
मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसचे इंजिन बिघडले; कोकण रेल्वे वाहतूक विस्कळीत

कोकणला सर्वाधिक लांबीची सागरी किनारपट्टी लाभली आहे. देश-विदेशातील पर्यटक येथे भेट देत असतात. या भागात पर्यटन वाढविण्यासाठी राज्य सरकारतर्फे विविध योजना राबविल्या आहेत. आता सागरी पर्यटन वाढविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कूबा डायव्हिंग केंद्र सुरू करण्यात येणार आहे. येथील समुद्रातील बुडीत जहाजावरील प्रवाळाचे दर्शन हे त्याचे विशेष आकर्षण असणार आहे. सागरी पर्यटनातून 800 स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी ग्वाही अर्थसंकल्पातून देण्यात आली आहे. राज्याच्या मत्स्य उत्पादनात गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मत्स्यबाजार स्थापना करण्याबरोबरच मासळी विक्री सुविधांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. याचा सर्वाधिक फायदा किनारपट्टी भागातील कोळी बांधवांना होणार आहे.

सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कूबा डायव्हिंग केंद्र
कोकण वगळता राज्यात ‘या’ भागात उष्णतेची लाट; अकोला, परभणी 45 अंशांवर

रायगडावर दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळा

दरम्यान, रायगड किल्ल्यावर आता दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या सोहळ्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील मौजे सावर (तालुका म्हसळा) येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकिय युनानी महाविद्यालय स्थापन करण्यास अर्थसंकल्पात मान्यता देण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news