India's first multi-species fish center in Vengurla | देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र वेंगुर्लेत

मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उभादांडा येथे भूमिपूजन; एका वर्षात होणार कार्यान्वित
वेंगुर्ले : बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्री नितेश राणे. सोबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे, प्रमोद कामत, दिलीप गिरप आदी.
वेंगुर्ले : बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्री नितेश राणे. सोबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे, प्रमोद कामत, दिलीप गिरप आदी.
Published on: 
Updated on: 
Summary

प्रकल्प कोकण समृद्धीचा मार्ग उजळवणारा ठरणार : मंत्री राणे

प्रकल्पासाठी २२.२४ कोटी रुपये खर्च अपेक्षित

वेंगुर्ले : पुढारी वृत्तसेवा

वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा येथे देशातील पहिल्या बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र कोकण आणि सिंधुदुर्गच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारा आणि स्थानिकांच्या आर्थिक समृद्धीचा मार्ग उजळवणारा ठरेल, असा विश्वास पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. शुक्रवारी या प्रकल्पाचे भूमिपूजन मंत्री राणे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. या प्रकल्पासाठी सुमारे २२.२४ कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे.

मंत्री राणे म्हणाले, सध्या देशात मत्स्य उत्पादनात आंध्र प्रदेश राज्य अव्वल स्थानी असून तिथे वार्षिक ५५ लाख ३९ हजार टन मत्स्य उत्पादन होते आणि केवळ मत्स्य व्यवसायामुळे त्या राज्याला ७७ हजार ८५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. या तुलनेत महाराष्ट्र सध्या ७ लाख ४३ हजार टन मत्स्य उत्पादन घेत असून राज्याचे उत्पन्न १२ हजार ७७५ कोटी रुपये आहे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील मच्छीमारांनाही जागतिक स्पर्धेत उतरवून ताकद देण्यासाठी राज्य सरकारने मत्स्य व्यवसायाला 'कृषीचा दर्जा' दिला आहे. यामुळे जिल्हा बँक आणि इतर वित्तीय संस्थांमार्फत शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांनाही सुलभपणे कर्ज आणि आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे. तसेच पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेच्या धर्तीवर राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना' लागू करण्यात आली आहे.

या उपक्रमात मत्स्योत्पादनासोबतच मत्स्य टाकाऊ पदार्थांपासून मूल्यवर्धन करण्यावरही भर असणार आहे. मासे आणि कोळंबी सोलताना निघणाऱ्या कचऱ्यापासून कॉस्मेटिक्स उद्योगात वापरले जाणारे अत्यंत मूल्यवान 'कोलाजेन' तयार करण्याचे कारखाने उभे राहू शकतात. आंध्र प्रदेशातील एका प्रकल्पाचे उदाहरण देताना मंत्री राणे यांनी सांगितले की, ३० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या एका कारखान्याला अमेरिकन कंपनीकडून तब्बल ४५० कोटींची ऑफर मिळाली होती.

हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुढील वर्षी १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकल्पामुळे मत्स्यव्यवसाय, महिला बचत गट आणि तरुण वर्गाला मोठा फायदा होईल आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आर्थिक अधिक सक्षम होईल, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला. जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे, वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप गिरप, वेंगुर्ला सभापती शंकर घारे सरपंच नीलेश चमणकर, सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, अतिरिक्त मत्स्यव्यवसाय आयुक्त महेश देवरे, कांदळवन दक्षिण कोकण विभागाच्या उपवनसंरक्षक कांचन पवार, शास्त्रज्ञ पंकज पाटील, सहआयुक्त नागनाथ भादुले, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय सागर कुवसेकर आदी उपस्थित होते.

वेंगुर्ले : बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्री नितेश राणे. सोबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे, प्रमोद कामत, दिलीप गिरप आदी.
Malvan Crime : मालवणात तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; घटनास्थळी संशयास्पद फिरणारी महिला ताब्यात

या प्रकल्पामुळे तरुणांना रोजगार मिळेल : जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी, देशातील हे पहिलेच बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र आपल्या जिल्ह्यात होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करून स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असल्याचे नमूद करत शुभेच्छा दिल्या. २२.२४ कोटी रुपयांच्या बहुप्रजातीय मत्स्यबीज प्रकल्पाची उभादांडा (वेंगुर्ला) येथे उभारणी केली जात असून यामुळे शाश्वत मत्स्यव्यवसायाला चालना मिळून युवकांना रोजगार मिळेल, अशी माहिती दिली. अध्यक्ष प्रमोद कामत यांनी पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात अनेक नावीन्यपूर्ण प्रकल्प येत असून हा प्रकल्प जिल्ह्याचे नावलौकिक वाढवणारा, लोकोपयोगी, रोजगार निर्मिती करणारा आणि आर्थिक सुबत्ता देणारा ठरेल, असे सांगितले.

वेंगुर्ले : बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्री नितेश राणे. सोबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे, प्रमोद कामत, दिलीप गिरप आदी.
Sindhudurg Groundwater Level : जिल्ह्यात भूगर्भातील पाणीपातळी 1 मिटरने खोलात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news