कुडाळ : मांडकुली येथील उबाठा शिवसेनेचे माजी उपसरपंच दिलीप निचम व शाखाप्रमुख नीलेश खानोलकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत मांडकुली येथे शिवसेनेत प्रवेश केला.
त्यामुळे मांडकुली गावामध्ये उबाठा शिवसेनेला खिंडार पडून शिवसेनेची ताकद वाढली आहे. यापुढे तुमच्यावर कुठच्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. गावाच्या विकासासाठी सदैव मी तुमच्या पाठीशी राहीन, अशी ग्वाही नीलेश राणे यांनी दिली.
गेली अनेक वर्ष या गावातील ग्रामस्थ उबाठा शिवसेनेसोबत होते. या ग्रामस्थांना आश्वासनापलीकडे काही मिळत नव्हते, या गावाचा विकास थांबला होता. गावाचा विकास व्हावा या हेतूने उबाठा शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्याचे निश्चित केले आणि हा प्रवेश करण्यात आला.(Maharashtra assembly poll)
यावेळी माजी सभापती अॅड. विवेक मांडकुलकर, मोहन सावंत, माजी पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, युवा मोर्चाचे रुपेश कानडे, श्री. वारंग आदी उपस्थित होते.