Historic triennial meet Malvan : मालवणातील ऐतिहासिक पारंपरिक त्रैवार्षिक भेट सोहळा उत्साहात

आई भवानी माता-छत्रपती शिवाजी महाराज-देव रामेश्वर यांची किल्ले सिंधुदुर्गवर झाली भेट
Historic triennial meet Malvan
कांदळगाव येथुन किल्ले सिंधुदुर्गवर भेटीसाठी निघालेली श्री देव रामेश्वराची स्वारी. सोबत ग्रामस्थ, देवतरंग व मानकरी.pudhari photo
Published on
Updated on

मालवण : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया, आदिशक्ती भवानी माता आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक, पारंपरिक त्रैवार्षिक किल्ले सिंधुदुर्ग भेट सोहळ्यासाठी कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू देव रामेश्वर आपल्या इतर वारेसुत्र, पालखी, तरंग, राणे, परब मानकरी, गावघर व स्थत मंडणासह किल्ले सिंधुदुर्ग, मालवण येथे शुक्रवार, दि. 23 जानेवारी रोजी कांदळगाव येथून रवाना झाले. या ऐतिहासिक, देदीप्यमान भेट सोहळ्यात सहकुटुंब सहभागी होऊन या ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार होऊन सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ, कांदळगाव ग्रामस्थांनी केले आहे.

23 रोजी सकाळी देव रामेश्वर आपल्या पंचायतन, वारेसुत्र, पालखी, तरंग व भाविक रयतेसह जोशीमांड मेढा येथे पोहोचल्यानंतर तेथे अल्पोपहार झाला. पुढे समुद्रमार्गे होडीतून किल्ले सिंधुदुर्ग येथे प्रवास करत ही स्वारी किल्ले सिंधुदुर्गवर शिवराजेश्वर मंदिरात दाखल झाली. तेथे देव रामेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासीक भेट सोहळा झाला. पुढे भवानी माता मंदिर येथे श्री देव रामेश्वर आणि आई भवानी यांचा भेट सोहळा झाल्यानंतर सायं. 4 वा. किल्ले सिंधुदुर्ग येथून स्वारीचा परतीचा प्रवास सुरू झाला. ही स्वारी दांडी येथे पोहोचल्यावर सर्व भाविकांना दांडी गावातर्फे चहापाणी आणि शीतपेय वाटप करण्यात आले. तेथून मौनीनाथ मंदिर-मेढाच्या दिशेने मार्गक्रमण करत श्री देव रामेश्वराची स्वारी रात्री मौनीनाथ मंदिरात पोहोचली व तेथे पालखीचा तेथे मक्काम झाला.

Historic triennial meet Malvan
Sindhudurg accident : सावंतवाडीत अल्पवयीन कार चालकाकडून अपघात

शनिवारी सकाळी मौनीनाथ मंदिरात पारंपरिक विधीवत पूजा अर्चा झाल्यानंतर भाविकांना आशीर्वचन देऊन श्री देव रामेश्वर आणि त्यांची स्वारी कुशेवाडा येथे प्रकाश कुशे यांच्या घरी दाखल झाली. तेथे कुशे कुटुंबीयांना पारंपरिक भेट व आशीर्वचन देऊन रितीरिवाजाची कामे पूर्ण करून पालखी पुढे रामेश्वर मांड, मालवण बाजारपेठ येथे मार्गस्थ होत दुपारी रामेश्वर मांड, बाजारपेठ येथे भाविकांना दर्शन व आशीर्वचन दिले. त्यानंतर रामेश्वर मांड मंडळातर्फे उमेश नेरुरकर यांच्या निवासस्थानी आणि भंडारी हायस्कूल मागील हॉ लमध्ये भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

रामेश्वर मांड येथून रामेश्वर मंदिर, कांदळगावकडे स्वारीच्या परतीचा प्रवास सुरू झाला. रात्री 8 वा. देव महापुरुष देवस्थान (मांगरी) कोळंब येथे पालखी, तरंग यांचा मुक्काम झाला. येथील गणेश (अवि) नेरकर यांच्या निवासस्थानी महाप्रसाद झाला. नंतर कांदळगावला जाणाऱ्या भाविकांसाठी नेरकर यांच्यामार्फत मोफत वाहनांची सोय करण्यात आली.

Historic triennial meet Malvan
Mahayuti unity Malvan : मालवणात महायुतीतील वाद शमला!

आज सोहळ्याची सांगता

रविवार, दि. 25 रोजी दुपारी 1 वा. व रात्री 10 वा. कोळंब महापुरुष देवस्थान येथे महाप्रसाद, नंतर आशीर्वचन देऊन देव रामेश्वर, इतर वारेसुत्र, पालखी, तरंग, भाविक आणि गावघर, कांदळगाव स्वगृही परतीच्या प्रवासाला निघणार. वाटेत आशीर्वचन देत देत रामेश्वर मंदिर, कांदळगाव येथे या ऐतिहासीक तीन दिवसीय सोहळ्याची सांगता होईल, अशी माहिती देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवालये विश्वस्त मंडळ, कांदळगाव, मानकरी व ग्रामस्थांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news