Sindhudurg Crime : गोवा दारूचे ८० बॉक्स हस्तगत; तिघांविरोधात गुन्हा दाखल

मालवण-दांडी परिसरात पोलिसांनी ही कारवाई
Goa Liquor Seizure
गोवा दारूचे ८० बॉक्स हस्तगत
Published on: 
Updated on: 

मालवण : मालवण शहरातील दांडी परिसरात अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ५ लाख ३८ हजार रुपये किमतीची गोवा दारू जप्त केली. शनिवारी, ३१ ऑक्टोबर रोजी रात्री करण्यात आलेल्या या छापेमारीत गोवा दारूचे तब्बल ८० बॉक्स हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारूविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मालवण-दांडी परिसरात अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी ही कारवाई केली.

छाप्यादरम्यान मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचा मद्यसाठा आढळून आला. पोलिसांनी एकूण ८० बॉक्स दारू जप्त केली असून, या मुद्देमालाची किंमत ५ लाख ३८ हजार रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर आणि अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत सहा.पोलिस निरीक्षक गणेश माने, पोलिस उपनिरीक्षक भगत, पोलिस उपनिरीक्षक अभिजित भोसले, पोलिस हवालदार सुहास पांचाळ आणि पोलिस हवालदार सुप्रिया पवार यांचा सहभाग होता. मालवण शहरात गोवा दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आल्याने ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.