Sindhudurg News : गिर्ये-विजयदुर्ग रामेश्वर मंदिरात शिवभक्तांची गर्दी

महाशिवरात्रीनिमित्त विशेष पूजेचे आयोजन
Sindhudurg News
गिर्ये-विजयदुर्ग रामेश्वर मंदिरात शिवभक्तांची गर्दी
Published on
Updated on

विजयदुर्ग ः गिर्ये, रामेश्वर, विजयदुर्ग या गावाचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात रविवारी महाशिवरात्री निमित्त श्री देव रामेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासून गर्दी केली होती.

यावेळी सभामंडपात अनेक भाविकांनी ओम नमः शिवाय सामूहिक जप करत सर्व वातावरण भक्तिमय केले होते. महाशिवरात्रीला सकाळपासूनच श्री देव रामेश्वर मंदिरात नित्य पूजा, अभिषेक, लघुरुद्र आधी धार्मिक कार्यक्रम सुरू करण्यात आले होते. श्री देव रामेश्वराची पूजा झाल्यानंतर गाभाऱ्यातील श्री देव रामेश्वरची मूर्ती सभा मंडपात आणून त्याची विधिवत पूजा करून भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. सायंकाळी पुराण वाचन करण्यात आले. श्री देव रामेश्वर यात्रेसाठी विजयदुर्ग पंचक्रोशीमध्ये मुंबई, पुणे, कर्नाटक येथून चाकरमानी मोठ्या प्रमाणात श्रीदेव रामेश्वर यात्रेसाठी दाखल झाले होते. पंचक्रोशीतील अनेक भाविकांनी श्री देव रामेश्वर येथे येऊन दर्शन घेऊन श्री देव रामेश्वर वर अभिषेक करण्यासाठी मंदिरात गर्दी केली होती.दुपारपासून पंचक्रोशीतील प्रसिद्ध भजने, ढोलवादन या सेवा श्री देव रामेश्वर मंदिरात सेवा सादर करण्यात येत होत्या.

श्री देव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त रात्री विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते.यावर्षी सर्व जत्रा मंदिराच्या खालील परिसरातच भरलेली आली होती. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी विजयदुर्ग आगारातून बसेसचे नियोजन करण्यात आले होते. श्री देव रामेश्वर देवस्थान विश्वस्त समिती, उत्सव समिती, जीर्णोद्धार कमिटी यांच्याकडून यात्रेसाठी सुसज्ज असे नियोजन करण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news