

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात दिवसांच्या गणेशोत्सवाची मंगळवारी मोठ्या थाटामाटात सांगता झाली. फटाक्यांच्या आतषबाजीत व ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात जिल्हाभरात मिळून 12 हजार 654 खासगी, तर 1 सार्व. गणेशमूर्तींचे विर्सजन करण्यात आले.
मंगळवारी सायंकाळी जिल्ह्यात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणेश मूर्तींचे विसर्जन करत लाडक्या बाप्पाला निरोप दिला. गणेश घाट विर्सजनासाठी दाखल गणेशमूर्ती, भाविक व ग्रामस्थांच्या गर्दीने फुलले होते. दुपारनंतर पावसानेही उसंत घेतल्याने विसर्जन करता आले.
बांदा पोलिस स्थानक- 614, दोडामार्ग- 1520, सावंतवाडी-1389, वेंगुर्ले- 1286 निवती-1061 कुडाळ- 2910 सिंधुदुर्गनगरी- 576, वैभववाडी- 1629, कणकवली- 400, विजयदुर्ग -243, देवगड-271, आचरा- 110, मालवण -645. यात कणकवली येथील 1 सार्व. गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.