Ganesh Chaturthi | जिल्ह्यात 72 हजार घरगुती तर 32 सार्वजनिक गणेशमूर्ती

Konkan Ganesh Utsav | कोकणचा महाउत्सव असलेल्या श्री गणेशोत्सवाला बुधवार, 27 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे.
Ganesh Chaturthi
जिल्ह्यात 72 हजार घरगुती तर 32 सार्वजनिक गणेशमूर्ती(Pudhari File Photo)
Published on
Updated on
Summary

16 ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात

बस, रेल्वेस्थानकांवर पोलिस बंदोबस्त

संजय वालावलकर

ओरोस : कोकणचा महाउत्सव असलेल्या श्री गणेशोत्सवाला बुधवार, 27 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. जिल्ह्यात या वर्षी 72 हजार 755 घरगुती, तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे 32 श्रीगणेश विराजमान होणार आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस प्रशासनाने दिली.

गणेशोत्सवासाठी येणार्‍या कोकणवासीयांच्या आरोग्य तपासणीसाठी एसटी स्थानक व रेल्वे स्थानकावर 16 ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात केली आहेत. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, सर्व बस व रेल्वेस्थानके, महामार्ग आणि सर्व घाट मार्गावर चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणतः दीड ते अकरा दिवसांपर्यंत गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होत असतो. दरम्यान, जिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. घराची रंगरंगोटी व सजावट सुरू आहे. बाजारापेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे.

Ganesh Chaturthi
Sindhudurg Crime News | मोरेतील अनधिकृत बंदूक कारखान्यात बंदुका विक्री प्रकरणी त्या पाच जणांना पोलीस कोठडी!

मुंबई, पुणे तसेच परजिल्ह्यांतून गावी येणार्‍या भाविकांच्या माध्यमातून ताप, डेंग्यू, मलेरिया आदी साथरोग पसरण्याचा धोका असतो. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानके, बसस्थानकांवर 16 आरोग्य पथके तैनात केली आहेत. त्या ठिकाणी प्रत्येक प्रवाशाची आरोग्य तपासणी करून तापसरीची लक्षणे आढणार्‍या प्रवाशांना जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल केले जाणार आहे.

Ganesh Chaturthi
Sindhudurg News| सिंधुदुर्ग कन्येचा गुन्हेगारी कमी करण्याचा निर्धार

32 सार्वजनिक गणपती

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग- 4, सावंतवाडी 7, आचरा 1, मालवण 2, कणकवली 5, बांदा 1, कुडाळ 4, वेंगुर्ला 3, देवगड 1, वैभववाडी 4 अशा एकूण 32 सार्वजनिक गणपतींची स्थापना होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news