konkan railway : कोकणवासीयांसाठी मोफत गणेशोत्सव रेल्वे प्रवास

१२ सप्टेंबर रोजी दादर-कुडाळ धावणार विशेष ‘शिवसेना एक्सप्रेस’
konkan railway
konkan railway
Published on
Updated on

मालवण : गणेश उत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ‘शिवसेना एक्सप्रेस’ या विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आ. नीलेश राणे यांच्या पुढाकारातून ही मोफत विशेष रेल्वेसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

१२ सप्टेंबर रोजी स. १० वा. दादर रेल्वे स्थानकातून ‘शिवसेना एक्सप्रेस’ कुडाळच्या दिशेने रवाना होणार आहे. या विशेष रेल्वेगाडीमुळे मुंबईत वास्तव्यास असलेल्या कोकणातील नागरिकांना गणेशोत्सवासाठी मूळ गावी येण्यास मोठी मदत होणार आहे. विशेष म्हणजे या प्रवासासाठी प्रवाशांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून प्रवास पूर्णपणे मोफत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news