Fondaghat Robbery Case Arrest |फोंडाघाटमधील जबरी चोरीप्रकरणी चौथ्या आरोपीला अटक

Fondaghat robbery case arrest
Fondaghat Robbery Case Arrest |फोंडाघाटमधील जबरी चोरीप्रकरणी चौथ्या आरोपीला अटकFile Photo
Published on
Updated on

कणकवली : फोंडाघाट येथे सकाळच्या सुमारास घरात घुसून दोन महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा प्रयत्न फसल्यानंतर पसार झालेल्या टोळीतील चौथ्या आरोपीला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री सांताक्रुज - मुंबई येथे अटक केली. त्याला बुधवारी सकाळी कणकवली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. विल्सन जॉन पिंटो (56, रा. सांताक्रुझ) असे चोरट्याचे नाव आहे. या प्रकरणी यापूर्वी तीन संशयितांना नवी मुंबईतून अटक करण्यात आली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

ही घटना फोंडाघाट येथे 30 नोव्हेंबरला स. 7 वा. च्या सुमारास घडली होती. तृप्ती लिंग्रस व त्यांची आई या दोघी घरी होत्या तर तृप्ती यांचे भाऊ मॉर्निंग वॉकला गेले होते. याच दरम्यान तीन व्यक्ती जबरदस्तीने लिंग्रस यांच्या घरात घुसले. त्यांनी तृप्ती व तिच्या आईच्या अंगावरील दागिने पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघींनीही आरडाओरड केल्यानंतर तिन्ही चोरटे हातातील साहित्य तिथेच टाकून पसार झाले होते.

याबाबत तृप्ती यांच्या फिर्यादीनुसार घटनेची कणकवली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने चारच दिवसांपूर्वी जगदीश श्रीराम यादव (25, भिवंडी), चनाप्पा साईबाणा कांबळे (50, ठाणे), नागेश हनुमंत माने (40, नेरूळ) अशा तिघांना मुंबई परिसरातून अटक केली होती. आता चौथा आरोपीही अटकेत आला आहे.

त्याला बुधवारी कणकवली न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली तर यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या कारवाईमध्ये एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, हवालदार राजू जामसंडेकर, आशिष गंगावणे, किरण देसाई, ज्ञानेश्वर तवटे आदी सहभागी झाले होते.

Fondaghat robbery case arrest
Sindhudurg news : भात लागवडीचा अभिनव ‌‘मंगेश पॅटर्न‌’!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news