Sindhudurg Fishing |मासेमारी नौका नांगरण्यासाठी मच्छीमारांची लगबग

मासेमारी नौका नांगरण्यासाठी मच्छीमारांची लगबग
वेंगुर्ले मांडवी खाडीपात्रात नांगरून ठेवलेल्या मच्छीमारी नौका.
वेंगुर्ले मांडवी खाडीपात्रात नांगरून ठेवलेल्या मच्छीमारी नौका.
Published on
Updated on

मळगाव : मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर १ जूनपासून सागरी मासेमारी बंदी लागू झाली. यामुळे वैगुर्ले तालुक्याच्या किनाऱ्यावर मच्छीमारांनी आपल्या मच्छीमारी नौका नांगरून ठेवण्याची लगबग सुरू केली आहे.

वेंगुर्ले मांडवी खाडीपात्रात नांगरून ठेवलेल्या मच्छीमारी नौका.
Separate Railway Zone : मराठवाडा, विदर्भ, खानदेशसाठी स्वतंत्र रेल्वे झोन करा

मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे २५ एप्रिलपासून सागरी वातावरण प्रतिकूल होते. तरीही सागरी वातावरणाचा अंदाज घेत वेंगुर्ले तालुक्यातील मच्छीमार समुद्रात जाऊन मच्छीमारी करत होते. शासनाने १ जून पासून मच्छीमारी बबंदी लागू केली असल्यामुळे मच्छीमाराने वेंगुर्ले तालुक्याच्या किनान्यावर आपल्या मच्छीमाती नौका नांगरून ठेवण्यासाठी लगबग सुरू केली आहे.

वेंगुर्ले तालुक्याच्या किनारपट्टीवर मच्छीमारांची मच्छीमारी बंदीच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवरील मच्छीमारांनी आपारया नौका मांडवी खाडीपात्रात सुरक्षित ठिकाणी आणल्या आहेत. तसेच, पावसाळ्याच्या दोन महिन्यांत नौका आणि जाळ्यांची दुरुस्ती करण्यासाठी मच्छीमार बांधव लगबम करताना दिसत आहेत. मच्छीमारी बंदी कालावधीत समुद्रात जाऊन मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांवर नियमाचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई करण्यात येणार आहे.

वेंगुर्ले मांडवी खाडीपात्रात नांगरून ठेवलेल्या मच्छीमारी नौका.
विधान परिषदेत अनिकेत तटकरेंचा मार्ग सुकर

नियमांचे उल्लंधन करून मासेमारी करणाऱ्या नौकांवर मत्स्यव्यवसाय विभाग आणि सागरी सुरक्षा यंत्रणांमार्फत दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या किनारपट्टी मागात प्रतिकूल परिस्थितीत मच्छीमारी बंदी कालावधीत मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात आऊ नये, असे आवाहन मत्स्य विभागाध्या वतीने करण्यात आले आहे.

मच्छीमारी बंदी कालावधीचे महत्त्व

शासनाने १ जून ते ३१ जुलै या कालावधीत सागरी मासेमारीठर पूर्णपणे बंदी लागू केली आहे. मान्सूनच्या सुरुवातीला समुद्रात होणान्या माशांच्या प्रजननाचे रक्षण करण्यासाठी आणि वादळी हवामानात मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाने हा ६१ दिवसांचा मच्छीमारी बंदी कालावधी जाहीर केला आहे. महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी हा १ जून ते ३१ जुलै असा दोन महिन्यां साठी लागू राहणार आहे. या मच्छीमारी बंदी कालावधी पावसाळ्यात माशांच्या प्रजननासाठी (breeding season) पोषक वातावरण मिळावे आणि वादळी वायांमुळे मच्छीमारांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये. हा या मच्छीमारी बंदी मागील प्रमुख उद्देश आहे. महाराष्ट्र सागरी मत्स्यपालन निकास्न अधिनियम २०२१ अंतर्गत सागरी मच्छीमारी बंदी चा हा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात यांत्रिकी बोटी आणि १० हॉर्सपावरपेक्षा (HP) जास्त क्षमतेचे इंजिन असलेल्या पारंपरिक बोटींना समुद्रात जावून मासेमारी करण्यास सक्त मनाई आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news