Sindhudurg News : दोडामार्ग- माेरगाव येथून वडील व बालिका बेपत्ता

सुमारे १४ दिवसांपूर्वीची घटना
Sindhudurg News
दोडामार्ग- माेरगाव येथून वडील व बालिका बेपत्ता
Published on
Updated on

दोडामार्ग : सावंतवाडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेला पाहण्यासाठी गेलेले वडील व लहान मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. लाडोबा लवू कदम (४०) व निहालिका लाडोबा कदम (६, दोघेही रा. मोरगाव, ता. दोडामार्ग) अशी या पिता-पुत्रीचे नाव आहे.

याबाबत प्रितम अर्जुन जाधव (३१, रा. मळगाव-जाधववाडी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. यानुसार त्यांची बहीण प्राची हिच्यावर सावंतवाडी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेनंतर उपचार सुरू होते. १६ जुलै २०२६ रोजी स. ९ वाजण्याच्या सुमारास त्यांचे भावोजी लाडोबा लवू कदम हे आपली सहा वर्षीय मुलगी निहालिका हिला घेऊन मोरगाव येथून सावंतवाडीकडे निघाले असल्याची माहिती त्यांनी स्वतः फोन करून प्रितम होती. मात्र दुपारपर्यंत ते साई हॉस्पिटलमध्ये न पोहोचल्याने कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

विविध ठिकाणी शोध घेतल्यानंतर बांदा बसस्थानक परिसरात चौकशी केली असता काही स्थानिकांनी संबंधित व्यक्ती व मुलगी यांना पाहिल्याचे सांगितले. दरम्यान, बसस्थानकाजवळच त्यांची हिरोहोंडा मोटारसायकल उभी आढळून आली. गाडीवर चावी तसेच रेनकोटची पिशवीही होती. त्यानंतरही परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेऊनही दोघांचा काहीच मागमूस लागलेला नाही.

लाडोबा लवू कदम यांची उंची ५ फूट ४ इंच, सावळा वर्ण, अंगाने मजबूत, काळे केस, मिशी ठेवलेली, फ्रेंचकट दाढी, अंगात पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट व पॅन्ट आणि निहालिका हिची उंची सुमारे ३ फूट, सावळा वर्ण, सरळ बॉबकट केस, अंगात ऑरेंज रंगाचे जॅकेट घातलेले आहे. हे दोघेही कोठेही आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news