EWS Reservation | कोकणातील मराठ्यांना ईडब्ल्यूएस आरक्षण द्यावे

अ‍ॅड. सुहास सावंत यांची मागणी
EWS Reservation
अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने मराठा व्यावसायिक मेळावा आणि भवानी ऑनलाईन सर्व्हिसेस दालन शुभारंभप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, अ‍ॅड. सुहास सावंत, नारायण राणे, दिनेश गावडे, अभिषेक सावंत आदी.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

सावंतवाडी : कोकणातील मराठा समाजाला आरक्षणाचा फायदा व्हावा यासाठी एथड (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) आरक्षण लागू करून शिक्षण आणि नोकरीत त्याचा लाभ मिळावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुहास सावंत यांनी केली आहे. हैदराबाद आणि सातारा गॅझेट कोकणाला लागू होण्याची शक्यता कमी असल्यामुळे आणि बहुतांश मराठा कुणबी दाखले घेण्यास तयार नसल्याने ही मागणी करण्यात आली आहे.अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित मराठा व्यावसायिक मेळावा आणि भवानी ऑनलाईन सर्व्हिसेस दालनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. हे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याहस्ते पार पडले.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, अ‍ॅड. सुहास सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे आणि दिनेश गावडे, मराठा महासंघ तालुका अध्यक्ष अभिषेक सावंत, विनायक गायकवाड, मनोज घाटकर, आशिष काष्टे, वैभव जाधव, आनंद नाईक, विनोद सावंत आदी उपस्थित होते.

EWS Reservation
Sawantwadi News | दगडांच्या फटीत पाणी गेल्याने भिंत कोसळली!

मराठा व्यावसायिक डिरेक्टरी आणि कौशल्य प्रशिक्षण

अ‍ॅड. सावंत यांनी सांगितले , मराठा व्यावसायिक उद्योजकांची ऑनलाइन डिरेक्टरी तयार करण्यात आली आहे. सर्वांनी यात नोंदणी करून सहभागी व्हावे. आजच्या अख (कृत्रिम बुद्धिमत्ता) युगात नोकर्‍यांवर परिणाम होत आहे. त्यामुळे कौशल्य प्रशिक्षण घेतलेले तरुणच टिकतील. यासाठी मराठा समाजातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण आणि आवश्यक माहिती दिली जाणार आहे.

शैक्षणिक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध कोर्सेसची माहिती पुस्तकांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाईल. उद्योजक डिरेक्टरीच्या माध्यमातून सर्वजण एकत्र आल्यास मराठा व्यावसायिक अधिक चांगल्या प्रकारे प्रगती करतील, असेही ते म्हणाले.

EWS Reservation
Sawantwadi News | दगडांच्या फटीत पाणी गेल्याने भिंत कोसळली!

कोकणातील मराठ्यांची आरक्षणाबाबतची स्थिती

अ‍ॅड. सावंत यांनी कोकणातील मराठा समाज आरक्षणाच्या बाबतीत गंभीर नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, कोकणातील मराठा समाज आरक्षणाबाबत संभ्रमावस्थेत आहे. बहुतेक 96 कुळी मराठा समाज असल्याने ते कुणबी दाखले घेण्यास तयार नाहीत आणि त्यांना हैदराबाद व सातारा गॅझेटचाही फायदा होणार नाही. त्यामुळे कोकणातील सुमारे 15 लाख मराठ्यांसाठी राजकीय पातळीवर एथड आरक्षण उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे.

यापुढे होणार्‍या पोलीस आणि शिक्षक भरतीमध्ये देखील एथड आरक्षण लागू करून कोकणातील तरुणांना शैक्षणिक आणि नोकरीच्या संधी मिळायला हव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

तरूणांनो नोकरी देणारे बना : संजू परब यांचे आवाहन!

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी मराठा समाज उद्योजक डिरेक्टरी सर्वांसाठी फायदेशीर ठरेल, असे सांगितले. कोकणातील मराठा समाज शेती-बागायतीत असल्याने व्यवसायाकडे वळला नाही. त्यामुळे तरुणांनी उद्योग-व्यवसायात येऊन नोकरी देणारे बनावे. समाजाची बांधणी करून जास्तीत- जास्त फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न करा, त्याला आमची साथ राहील, असे आवाहन त्यांनी केले.

ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी अ‍ॅड. सुहास सावंत यांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. ते म्हणाले, आपल्याला आरक्षण मिळेल की नाही यापेक्षा आपण उद्योग व्यवसायात पुढे येऊन नोकरी देणारे बनले पाहिजे. यासाठी निश्चितच सहकार्य मिळेल, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष विनय गायकवाड यांनी मराठा समाज उद्योजक डिरेक्टरी आणि इतर उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. मराठा महासंघ तालुकाध्यक्ष अभिषेक सावंत यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले.

अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने मराठा व्यावसायिक मेळावा आणि भवानी ऑनलाईन सर्व्हिसेस दालन शुभारंभप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, अ‍ॅड. सुहास सावंत, नारायण राणे, दिनेश गावडे, अभिषेक सावंत आदी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news