Elephants Destroy Farms Kolzar | हत्ती आले अन् बागायती उद्ध्वस्त करून गेले

Elephants Rampage | कोलझर गावात हत्तींचा धुमाकूळ; सहा हत्तींच्या कळपाचा जंगलात वावर, पावसामुळे हत्तींना हुसकावण्यास मर्यादा
Elephants Destroy Farms Kolzar
कोलझर येथे हत्तीने उन्मळून टाकलेला माड.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

दोडामार्ग : मागील सहा दिवसांपासून जंगलात वावरणार्‍या हत्तींनी त्यांचा मोर्चा कोलझर गावाकडे वळविला. येथील फळबागायतीत घुसून शेतकर्‍यांच्या नारळ व केळी बागायतीचे अतोनात नुकसान केले. यात शेतकरी अनिल देसाई, रुपेश वेटे, मेघशाम देसाई, श्रीधर देसाई या शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

तळकट पंचक्रोशीत सहा हत्तींचा कळप वावरत आहे. मागील सहा दिवसांपासून या हत्तींचा वावर येथील जंगल परिसरात होता.

Elephants Destroy Farms Kolzar
Sindhudurg News| सिंधुदुर्ग कन्येचा गुन्हेगारी कमी करण्याचा निर्धार

सतत पडणार्‍या पावसामुळे या हत्तींचा मागोवा काढण्यातही वन विभागाने नेमलेल्या पथकाला यश मिळत नव्हते. हे हत्ती शनिवारी पहाटेच्या सुमारास कोलझर परिसरात दाखल झाले. येथील शेतकर्‍यांच्या फळबागायतीत घुसून माड उद्ध्वस्त केले. केळींचा फडशा पाडला. त्यामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या परिसरात हत्तींचा वाढता वावर पाहून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

Elephants Destroy Farms Kolzar
Dodamarg Burglary Case | माटणे येथे दिवसाढवळ्या घरफोडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news