

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे- गोठावेवाडी येथील वृद्ध शेतकरी सोमण विठ्ठल घावरे ( ७०) यांच्यावर गवा रेड्याने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला.
श्री. घावरे हे आपल्या भात शेतीची पाहणी करण्यासाठी शेतात गेले होते. ते गवतात लपलेल्या गवारेड्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यात त्यांच्या डोक्याला व मानेला गंभीर दुखापत झाली आहे. ग्रामस्थ व शेतकर्यांनी त्यांना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करून, त्यांच्यावर प्राथमिक करत पुढील उपचारासाठी, त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या शेतात गवारेड्यांचा वावर वाढला असून, त्यांनी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. आताच कोठे शेतीची कामे संपत आली आहेत. मात्र, या जंगली प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. आंबोलीचे नक्षेत्रपाल वैभव भिसे यांनी घटनास्थळी भेट देत जखमीची भेट घेतली. जखमी शेतकरी श्री.घावरे यांना वनविभागाकडून वैद्यकीय उपचारांचा खर्च दिली जाणार आसल्याची माहिती त्यांनी दिली.