कौटुंबिक वादातून महिलेला चाकूचा धाक दाखवत हातपाय बांधून बाथरूममध्ये डांबले

देवगड येथील पुजारेवाडी येथील प्रकार
The woman was trapped in the bathroom due to a family dispute
कौटुंबिक वादातून महिलेला बाथरूममध्ये डांबलेFile Photo
Published on
Updated on

देवगड/ प्रतिनिधी

कौटुंबिक वादातून महिलेला चाकूचा धाक दाखवत तिचे हातपाय बांधून बाथरूममध्ये कोंडून घातल्याचा प्रकार पुजारेवाडी येथे घडला. ही घटना मंगळवारी (दि.24) मध्यरात्री 2 च्या सुमारास घडली. या प्रकरणी स्मिता गणेश घाडी (वय.६०), अमिता अनिल बाणे (वय.६२), दिव्या गणेश घाडी (वय.३२), अनिल गणपत बाणे (वय.६३), सुनीता सूर्यकांत बाणे (वय.६४) या संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत विवाहितेने घटनेची माहिती पोलिसांच्या ११२ नंबरवर तात्काळ दिल्याने पीडित विवाहितेची देवगड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सुटका केली.

विरार : महिलेने कर्मचाऱ्यांना मीटररूममध्येच डांबले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता ही मंगळवारी पहाटे २ वा. च्या सुमारास घरानजीक असलेल्या शौचालयाच्या बाहेर आल्यानंतर चारही संशयितांनी तिला चाकूचा धाक दाखविला. त्यानंतर तिचे हातपाय नायलॉन दोरीने घट्ट बांधून बाथरुमकडे ओढत नेले. त्यानंतर तिला बाथरुममध्ये कोंडून बाहेरून लॉक लावून बंदिस्त केले. या घटनेदरम्यान पीडित विवाहितेकडे मोबाईल होता. तिने पोलिसांच्या ११२ क्रमांकावर फोन करून घडलेला प्रकार सांगितला.

The woman was trapped in the bathroom due to a family dispute
वारंवार वीज खंडीत केल्‍याने शेतकर्‍यांचा उद्रेक, वीज कर्मचाऱ्यांना डांबले

त्यानंतर देवगड पोलीस स्थानकाचे कॉन्स्टेबल नीलेश पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी जात पीडित विवाहितेची सुटका केली. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असल्याचे पीडित विवाहितेने देवगड पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून दाखल फिर्यादीनुसार स्मिता घाडी, अमिता बाणे, दिव्या गणेश घाडी, अनिल बाणे, सुनीता बाणे या संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास महिला पोलीस हवालदार अमृता बोराडे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news