
सावंतवाडी : जीवनात यशस्वी होण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चाला. कोणीतरी पैसे देऊन मत विकत घेवू पहात असेल तर त्याला थारा देऊ नका. अमिषाला बळी पडू नका. सर्वसामान्यांसाठी योजना आणणारे महायुतीचे सरकार पुन्हा आणण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी केले.
सावंतवाडी तालुक्यातील शिवसेना, भाजप, रिपाई महायुतीचा दलित समाज मेळावा वैश्य भवन येथे पार पडला. या मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी जि.प.सभापती अंकुश जाधव,भाजपचे चंद्रकांत जाधव, गुंडू जाधव, गुरू कासले, राजन कांबळे, हर्षदा जाधव, तानाजी कुणकेरकर, सोनीया मठकर, अर्चना जाधव, लाडू जाधव आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.(Maharashtra assembly poll)
केसरकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा, अशी शिकवण दिली. त्यांच्या तत्त्वानुसार आम्ही चालतो. लोकशाहीचं महत्व पटवून देताना आमिषाला बळी पडू नका असे सांगितले आहे. त्याचे पालन करत महायुती सरकार काम करत आहे.सर्वार्ंनी पाठीशी उभे रहा असे आवाहन केले.
जर्मनीमध्ये चांगली संधी आपल्या मुलांना आहे. ती संधी साधा, कोणताही व्यवसाय करण्यात कमीपणा बाळगू नका. फायदा होणारा कोणताही व्यवसाय तुम्ही करावा. त्यासाठी शिक्षण हे फार महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले. केवळ राजकारणात एकत्र न येता समाज म्हणून एक राहणं आवश्यक आहे. आपल्या मुलांना शिक्षण देणे व रोजगार, व्यवसायासाठी प्रेरणा द्यावी. सावंतवाडीचे समाजमंदिर माझ्या संकल्पनेतून साकारले आहे. वस्त्यामध्ये रस्ता, पाणी, वीज घराघरात पोहचवली. रचनाबद्ध कारभार केला. येत्या 26 नोव्हेंबरच्या संविधान यात्रेत पुन्हा आमदार व मंत्री म्हणून मी सहभागी होणार आहे, त्यासाठी तुमचा आशीर्वाद द्या असे आवाहन केसरकर यांनी केले.(Maharashtra assembly poll)