

ओरोस : उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील जनहीत याचिका क्र. 198/ 2014 सह 1 79/ 2012 मध्ये 5 डिसेंबर 2018 व 22 मार्च 2024 च्या आदेशान्वये संपूर्ण दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील एकूण 13 गावांमध्ये वृक्षतोडीस बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती सावंतवाडी -दोडामार्ग टॉस्क फोर्स समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा सहा. वनसंरक्षक वैभव बोराटे यांनी दिली.
पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी 25 एप्रिल 2025 रोजी प्रसिध्द केलेल्या प्रस्तावित अधिसूचनेमध्ये दोन्ही तालुक्यातील एकूण 25 गावांचा इको सेन्सिटिव्ह एरियामध्ये समावेश आहे. याबाबत उच्च न्यायालय मुंबई यांचेकडे जनहीत याचिका क्र. 198/ 2014 मध्ये 5 डिसेंबर 2018 व 22 मार्च 2024 चे आदेशान्वये अवैधरीत्या होणार्या वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवणेकामी व पर्यावरणाचा र्हास रोखण्यासाठी सावंतवाडी- दोडामार्ग टास्क फोर्स समिती तयार करण्यात ओली आहे.
या समितीमध्ये महसूल विभाग, वन विभाग व पोलिस विभागाच्या अधिकार्यांचा समावेश आहे. सावंतवाडी-दोडामार्ग ढरीज्ञ ऋेीलश समितीचे अध्यक्ष हे सावंतवाडी प्रांताधिकारी असून सदस्य सचिव सहा. वनसंरक्षक हे आहेत. त्याचबरोबर यासमितीमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार सावंतवाडी व दोडामार्ग, वनपरिक्षेत्र अधिकारी सावंतवाडी, आंबोली व दोडामार्ग, पोलिस निरीक्षक सावंतवाडी, दोडामार्ग हे सदस्य आहेत.
या समितीच्या मासिक बैठकीमध्ये उच्च न्यायालयाकडील आदेशानुसार वृक्षतोडीस प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये संबंधित विभागांनी वृक्षतोडीस प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने पर्यावरणीय र्हास रोखण्यासाठी केलेली कार्यवाही, प्रचार-प्रसिध्दी व प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा दरमहा आढावा घेतला जातो.
वृक्षतोड बाबत ऑनलाईन तक्रारीसाठी सावंतवाडी-दोडामार्ग ढरीज्ञ ऋेीलश समीतीचा ईमेल आयडी तयार करण्यात आला आहे, ईमेल आयडी ीवींषीरुरपीुंरवळ सारळश्र.लेा असा आहे, या ईमेल वर वृक्षतोडीच्या घटनाबाबत तक्रार दाखल करू शकता. तसेच वृक्षतोड वाचत तक्रारीसाठी आपण वनविभाग सावंतवाडी 02363-272005 यांच्याकडे दूरध्वनीद्वारे तक्रार दाखल करू शकता.
असनिये, पडवे माजगाव, भालावळ, तांबोळी, सरमळे (नेवली सह), दाभिळ, ओटावणे, कोनास, घारपी, उडेली, केसरी, फणसवडे.
कुंब्रल, पंतुर्ली, तळकट, झोळंबे, कोलझार, शिरवळ, उघाडे, काळणे, भिकेकोनाळ, कुंभवडे, खडपडे, भेकुर्ली, फुकेरी.