

दोडामार्ग : दोडामार्ग भोसले कॉलनी येथे घरी खेळताना एका अडीच वर्षाच्या मुलाचा जिन्याच्या रेलिंगवरून पाय घसरल्याने तो खाली पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
त्यमकुमार कुंदन मेहता असे त्या मुलाचे नाव असून, अधिक उपचारासाठी त्याला येथील ग्रामीण रुग्णालयातून आजिलो-गोवा येथे नेताना धावत्या रुग्णवाहिकेचे मागील दार उघडले अन् रुग्णासह त्याच्या नातेवाईकांना धडकीच भरली.
यावेळी स्थानिकांनी आरडाओरडा करून दरवाजा लावला व तो पुन्हा उघडू नये म्हणून दरवाजाला ड्रेसिंग पट्टी बांधून रुग्णाला पुढे नेले. या प्रकाराबाबत उपस्थितांनी तीव्र शब्दात नाराजीही व्यक्त केली.