‘जिल्हा उपनिबंधक’मधील दोन अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

Sindhudurg News : गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणीसाठी घेतली 33 हजारांची लाच
District Sub-Registrar Corruption
माणिक सांगळे व उर्मिला यादवpudhari photo
Published on
Updated on

ओरोस : सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दोन वरिष्ठ अधिकार्‍यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. जिल्हा उपनिबंधक वर्ग 1 चे अधिकारी माणिक भानुदास सांगळे (वय 56) व कार्यालय अधीक्षक वर्ग 3 च्या अधिकारी उर्मिला महादेव यादव 33 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात मिळून आले. या कारवाईमुळे सहकारी क्षेत्रात एकच खळबळ उडाली. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी या विभागाचे पोलिस उपअधीक्षक अरुण पवार यांनी लावलेल्या सापळ्यात हे दोन्ही अधिकारी अडकले.

गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणी कामी तक्रारदार यांचे श्री स्वामी समर्थ गृहनिर्माण संस्था मर्यादीत, रेवतळे, मालवण, जि. सिंधुदुर्ग या गृहनिर्माण संस्थेच्या अभिहस्तांतरण आदेशाप्रमाणे अंमलबजावणी करून जमीन संस्थेच्या नावे करण्याकरिता रुपये 50 हजार रकमेच्या लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार 10 जानेवारी 2025 रोजी केली होती. त्यानुसार 16 जानेवारी 2025 रोजी पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीदरम्यान संशयित आरोपी लोकसेविका उर्मिला यादव यांनी तक्रारदार यांच्याकडे 40 हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार मंगळवारी करण्यात आलेल्या दुसर्‍या पडताळणीदरम्यान माणिक सांगळे व उर्मिला यादव 33 हजार रुपयांची लाच घेताना प्रत्यक्ष मिळून आले. दोन्ही संशयितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी सायंकाळ उशिरापर्यंत सुरू होती.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अरुण पवार, सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मनोज जिरगे, पोलिस जनार्दन रेवंडकर, रविकांत पालकर, प्रथमेश पोतनीस, विशाल नलावडे, संजय वाघाटे, समिता क्षिरसागर यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news