धाराशिव येथील शैक्षणिक सहलीच्या बसचा देवगडमध्ये भीषण अपघात

Sindhudurg Accident | खाकशी येथील तीव्र वळणावर अपघात : चार विद्यार्थी किरकोळ जखमी
 Sindhudurg Accident
धाराशिव येथील सहलीच्या एसटीचा खाकशी शाळेनजीक असलेल्या तीव्र धोकादायक वळणावर झालेला भीषण अपघात ( छाया वैभव केळकर, देवगड )
Published on
Updated on

देवगड : खाकशी मार्गे कुणकेश्वर कडे जाणाऱ्या शैक्षणिक सहलीच्या बसला खाकशी शाळेजवळील धोकादायक वळणावर अपघात झाला. वळणामुळे चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटून बस डाव्या बाजूला पाच फूट खाली जाऊन नळयोजनेच्या पाईपलाईनला धडकली. या अपघातात चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली.

अपघातात एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. पाईपलाईन फुटून पाणी रस्त्यावर आले त्यामुळे देवगड जामसंडे शहराच्या पाणीपुरवठा बंद झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती समजताच देवगड आगार व्यवस्थापक व स्थानक प्रमुख व कर्मचारी यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यातील जयहिंद विद्यालय कसबे तडोळे या शाळेची सहल शुक्रवारी धाराशिव आगाराच्या एसटी बसने देवगडमध्ये आली होती. दुपारी मिठमुंबरी येथे जेवण करून ही सहल खाकशी मार्गे कुणकेश्वर कडे जाण्यासाठी रवाना झाली. मात्र खाकशी शाळेनजीक असलेल्या धोकादायक वळणावर चालक विभीषण गायकवाड यांचा बसवरील ताबा सुटला. सुदैवाने झाडेझुडपे आंबा बागायत व देवगड नळयोजनेची पाईपलाईन असल्याने त्या पाईपलाईनला जाऊन एसटी धडकून थांबली. गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी झालेली नाही.

बस मध्ये ४४ विद्यार्थी व ४ शिक्षक असे एकूण ४८ जण होते. अपघाताची माहिती समजतात स्थानिक ग्रामस्थांनी धावाधाव करून सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना अपघातग्रस्त एसटीतून बाहेर काढले. एसटी आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप, स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर, तसेच एसटी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. विद्यार्थी शिक्षक चालक यांची तात्काळ खाकशी येथील साई मंदिरात तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. देवगड आगार व्यवस्थापक यांनी तात्काळ देवगड आगाराच्या बसची व चालकाची व्यवस्था करून विद्यार्थी शिक्षकांना पुढील प्रवासासाठी रवाना केले.

सध्या पर्यटन हंगाम सुरू असून मोठ्या प्रमाणात शालेय सहली कोकण पर्यटनासाठी देवगड मालवण या ठिकाणी येत आहेत.मात्र या अपघातामुळे सहलीतील मुलांच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच खाकशी येथील धोकादायक वळणावर संरक्षक गार्ड बसविणे. आवश्यक आहे कारण यापूर्वीही एसटी व इतर वाहनांचा अपघात या ठिकाणी झालेला आहे. बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी या निमित्ताने होत आहे. अपघातातील चालकाने ब्रेक लागलेलाच नाही अशी माहिती आगार व्यवस्थापकांना दिली. तरी आगार व्यवस्थापक घोलप यांनी याची सविस्तर चौकशी करणार असल्याचे यावेळी सांगितले.

देवगड जामसंडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला बस जाऊन धडकून थांबली. त्‍यामुळे पुढील अनर्थ टळला
देवगड जामसंडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला बस जाऊन धडकून थांबली. त्‍यामुळे पुढील अनर्थ टळला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news