Ratnagiri News : देवगड जि.प.साठी 27 तर पं.स.साठी 37 उमेदवारी अर्ज

देवगड तालुक्यात एकूण 64 उमेदवारी अर्ज दाखल, भाजपच्या वतीने सर्वाधिक 18 तर ठाकरे शिवसेनेच्या वतीने 17 अर्ज
Ratnagiri News
देवगड जि.प.साठी 27 तर पं.स.साठी 37 उमेदवारी अर्ज
Published on
Updated on

देवगड ः देवगड मध्ये जि.प. व पं.स.निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी शेवटच्या दिवशी गर्दी केली होती. दाखल उमेदवारी अर्जामध्ये भाजपातर्फे 7 जि.प.साठी व 11 पं.स.गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले तर शिवसेनेतर्फे पंचायत समितीसाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. मनसेने दोन उमेदवारी अर्ज दाखल केले असून एक जि.प. व एक पंचायत समितीसाठी तर काँग्रेसने दोन जि.प.गटासाठी व एक पं.स.गटासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. ठाकरे शिवसेनेच्या वतीने 5 जि.प.गटासाठी व 12 पं.स.गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. जि.प.च्या सात जागांसाठी 27 तर पंचायत समितीच्या 14 जागांसाठी 37 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

जि.प.व पं.स.साठी अर्ज दाखल भाजपचे उमेदवार जिल्हा परिषद -शिरगांव -देवदत्त दामोदर कदम, किंजवडे (सर्वसाधारण - महिला) मतदारसंघातून सौ. सावी गंगाराम लोके, कुणकेश्वर (ना.मा.प्र.) सुनील बाळकृष्ण पारकर, पुरळ (सर्वसाधारण) संजय नामदेव बोंबडी, पडेल (सर्वसाधारण महिला) सुयोगी रवींंद्र घाडी, बापर्डे (सर्वसाधारण महिला) सौ. अवनी अमोल तेली, पोंभुर्ले (ना.मा.प्र. महिला) सौ. अनुराधा महेश नारकर.

पंचायत समितीचे भाजपा उमेदवार

पुरळ (ना.म.प्र. महिला) सौ. संजना सत्यवान आळवे, तिर्लोट (सर्वसाधारण) रवींंद्र तिर्लोटकर, पडेल (सर्वसाधारण) अंकुश यशवंत ठूकरुल तसेच नाडण (सर्वसाधारण) गणेश सदाशिव राणे, बापर्डे (सर्वसाधारण महिला) संजना संजय लाड, फणसगाव (सर्वसाधारण महिला) समृध्दी संतोष चव्हाण, पोंभुर्ले(नामाप्र) सादिक जैनुद्दीन डोंगरकर, शिरगांव (सर्वसाधारण महिला) सौ. शीतल सुरेश तावडे, किंजवडे (सर्वसाधारण महिला) सौ. स्नेहा श्रीकृष्ण अनभवणे, कोटकामते (ना.म.प्र. महिला) सौ. ऋतूजा राकेश खाजणवाडकर, मुणगे (सर्वसाधारण) सदाशिव पुरुषोत्तम ओगले अर्ज दाखल केले.

ठाकरे शिवसेनेचे उमेदवार

जिल्हा परिषद -अभिषेक कदम (शिरगाव), गणेश गावकर (कुणकेश्वर),सुनील दत्ताराम तेली (पुरळ), अंकिता सुहास वाडेकर (पडेल), दीपाली मनोहर मेस्त्री (पोंभुर्ले).

पंचायत समिती मतदारसंघ

सान्वी सुधाकर तिर्लोटकर (पुरळ), सुनील गणपत तिर्लोटकर (तिर्लोट), शशांक शरद तावडे (पडेल), सुहास वसंत वाडेकर (नाडण), सुलोचना सिताराम धुरी (बापर्डे), विष्णू बाबाजी घाडी (मणचे), व्यंकटेश जगन्नाथ नर (पोंभुर्ले), रोहिणी संतोष लाड (फणसगाव), मीरा मयुर सावंत (शिरगाव), प्रगती प्रदीप तेली (मुणगे), दीपक नारायण कदम (मुणगे), गणेश गोपाळ वाळके (कुणकेश्वर)

काँग्रेसच्या वतीने दोन जि.प.साठी व एका पंचायत समिती गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. माजी सभापती रेश्मा सावंत यांनी काँग्रेसच्यावतीने किंजवडे जि.प.साठी व बापर्डे जि.प.मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून मानसी मंगेश जाधव यांनी तळवडे पं.स.गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मनसेच्यावतीने एक जि.प.गटासाठी व एक पं.स.गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.यामध्ये रंजन सदानंद शिरगावकर यांनी शिरगाव जि.प.मतदारसंघातून व सौ.निकिता नारायण दाभोळकर यांनी किंजवडे पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही.

उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांमध्ये तीन माजी सभापती, शिवसेनेचे दोन्हीही तालुकाप्रमुख, चार माजी जि.प.सदस्य, माजी पं.स.सदस्य तसेच तीन विद्यमान सरपंच यांचा समावेश आहे.बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवशी देवगड तहसिल कार्यालयात उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी तसेच राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवगड तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या दालनामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी नितीन राऊत यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार आर.जे.पवार हे उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाचे माजी आमदार ॲड.अजित गोगटे, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, बाळा खडपे, देवगड मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, पडेल मंडल अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर, महिला तालुकाध्यक्षा सौ.उष:कला केळूस्कर, ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रविंद्र जोगल, युवक तालुकाप्रमुख गणेश गावकर, काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, तालुकाध्यक्ष उमेश कुळकर्णी, प्रियांका साळसकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, भाजपा शहरअध्यक्ष वैभव करंगुटकर, दयानंद पाटील, ॲड.प्रकाश बोडस, ॲड.प्रसाद करंदीकर, अजित कांबळे, सौ.तन्वी चांदोस्कर, योगेश पाटकर, ठाकरे शिवसेनेचे संदीप डोळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news