Devgad News | फणसे समुद्रात खलाशीचा मृतदेह सापडला; देवगड तालुक्यातील सुरज आचरेकर बेपत्ता प्रकरणाचा दुर्दैवी शेवट

‘बन्सी’ नावाच्या मच्छिमारी नौकेवर सुरज होता खलाशी, 1 मे रोजी झाला होता बेपत्ता
Devgad News
Devgad News
Published on
Updated on

देवगड : फणसे येथील समुद्रात नांगर टाकून उभ्या असलेल्या मच्छिमारी नौकेवरील खलाशी बेपत्ता झाल्यानंतर त्याचा मृतदेह अखेर सापडला आहे. मोंड झरकरवाडी येथील सुरज सूर्यकांत आचरेकर (वय 30) याचा मृतदेह रविवारी सकाळी सुमारे 9.15 वाजण्याच्या सुमारास फणसे किनाऱ्यालगतच्या समुद्रात आढळून आला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवगड तालुक्यातील ‘बन्सी’ नावाच्या मच्छिमारी नौकेवर सुरज आचरेकर हा खलाशी म्हणून कार्यरत होता. 1 मे रोजी रात्री 12 ते पहाटे 5 या कालावधीत फणसे समुद्रात ही नौका नांगर टाकून उभी असताना तो अचानक बेपत्ता झाला.

Devgad News
Devgad Ambergris Seized | देवगडमध्ये ८ कोटींचे अंबरग्रीस जप्त; तिघांना अटक; बनावट ग्राहक तयार करून रचला सापळा

घटनेनंतर त्याचा शोध घेण्यात आला, मात्र तो सापडला नव्हता. त्यामुळे हितेश संजय हरम (वय 26, रा. देवगड किल्ला) यांनी देवगड पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, रविवारी सकाळी त्याचा मृतदेह समुद्रात आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार आशिष कदम करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news