Devgad Accident | जामसंडे आझादनगर येथे भीषण अपघात: रिक्षा पलटी होऊन चारजण गंभीर जखमी!

अवघड वळणावर रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटले
Devgad Accident
Devgad Accident | जामसंडे आझादनगर येथे भीषण अपघात: रिक्षा पलटी होऊन चारजण गंभीर जखमी!
Published on
Updated on

देवगड : जामसंडे आझादनगर येथील एका अवघड वळणावर रिक्षा पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात निरोम येथील दोन महिलांसह एकूण चारजण गंभीर जखमी झाले आहेत. तेजस प्रकाश नारकर (३५, निरोम मधलीवाडी), मनोरमा रमेश राऊत (६५), नयना नामदेव राऊत (५३), आर्या सचिन राऊत (१२, सर्व रा. निरोम मधलीवाडी) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात सुदैवाने एका मायलेकाला कोणतीही दुखापत झाली नाही. हा अपघात सोमवारी दुपारी ३.३० वा. च्या सुमारास घडला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, निरोम मधलीवाडी येथील मिनाक्षी सचिन राऊत (३०) या त्यांचा मुलगा सोहम सचिन राऊत (७) तसेच मनोरमा राऊत, नयना राऊत, आर्या राऊत यांना सोबत घेऊन सोमवारी दुपारी २ वा. च्या सुमारास निरोमहून पडेल येथे आपल्या माहेरी जात होत्या. या प्रवासाकरिता त्यांनी गावातीलच मधली वाडी येथील रिक्षाचालक तेजस नारकर याची रिक्षा भाड्याने केली. दुपारी ३.३० वा. च्या सुमारास त्यांची रिक्षा जामसंडे आझादनगर येथील एका अवघड वळणावर आली असता रिक्षाचालक तेजस नारकर याचे रिक्षावरील नियंत्रण सुटले व रिक्षा पलटी झाली.

हा अपघात एवढा भीषण होता की, रिक्षाचालक तेजस नारकर याच्यासह रिक्षामधील प्रवासी मनोरमा राऊत, नयना राऊत, आर्या राऊत या चौघांना गंभीर दुखापती झाल्या. तेजस नारकर याच्या डोक्याला व उजव्या पायाला, मनोरमा राऊत यांच्या उजव्या पायाला, नयना राऊत यांच्या उजव्या हाताला, आर्या राऊत हिच्या पायाला व उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. तर मिनाक्षी राऊत व त्यांचा मुलगा सोहम या दोघांना सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. अपघात घडताच स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य राबविले. जामसंडे येथील श्री दिर्बा रुग्णवाहिका सेवेचे तेजस देशपांडे यांनी घटनास्थळी जात सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची माहिती मिळताच देवगड पोलिसांनी रुग्णालयात जात जखमींची विचारपूस करून अपघाताची माहिती घेतली. तसेच घटनास्थळी जात पंचनामा केला. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news