'देवगड हापूस' थेट गोवळ ते दुबई !

तीन युवा शेतकऱ्यांनी एक हजार डझन हापूसची केली निर्यात
'Devgad Hapus' directly from Goval to Dubai!
'देवगड हापूस' थेट गोवळ ते दुबई !File Photo
Published on
Updated on

कासार्ड : दत्तात्रय मारकड

'फळांचा राजा' म्हणून ओळखला जाणारा हापूस आंबा. आमच्या राजाची चव न्यारीच! आणि हापूस आंबा जगात भारी ! म्हणत देवगड तालुक्यातील गोवळ गावातील प्रगतशील आणि अभ्यासू शेतकरी अनिल चव्हाण, नागेश बोडेकर व अजित बोडेकर या युवा शेतकऱ्याने आपल्या बागेतील आंबा थेट दुबईला पाठवला आहे. (Devgad Hapus)

आंबा हा शब्द उच्चारला तरी डोळ्यासमोर गोड, रसाळ, पिवळसर केशरी रंगाचा 'हापूस आंबा' दिसायला लागतो. हापूस आंबा हे कोकणच्या मातीतील उत्पादन आहे. कोकणातील देवगड प‌ट्ट्यातील हापूस आंबा म्हणजे निसर्गाची किमया असल्याचे मानले जाते. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या देवगड हापूसला जगभरातून मागणी आहे. यावर्षी नैसर्गिक संकट आणि असंख्य आव्हान पेलत हा देवगड हापूस आता बागेतून थेट दुबईला सातासमुद्रापार पोहोचला आहे. आखाती देशात देवगड हापूस आंब्याला चांगला दर मिळत आहे. फळ बाजारात हापूसची आवक वाढत असून, परदेशातून देखील हापूसची मागणी वाढत आहे. त्यामुळे याचा फायदा कोकणातील आंबा बागायतदारांना आणि शेतकरी वर्गाला होणार आहे.

आमच्या प्रतिनिधीला माहिती देताना युवा शेतकरी अनिल चव्हाण म्हणाले, यावर्षी आंब्याचे उत्पादन फार कमी आहे. सध्या देवगड हापूस बाजारात १५ ते २० टक्के उपलब्ध झाला आहे. एक्सपोर्ट मालाला परदेशात विशेष करून मागणी आहे. आम्ही तिघांनी मिळून प्रायोगिक तत्त्वावर १ हजार डझन देवगड हापूस आंबे दुबईला पाठवले आहेत. आणखीही त्याठिकाणाहून मागणी आहे. लवकरच आणखी काही पेट्या दुबाईला पाठवणार आहोत. यापूर्वी अनेक देशांत आपण हापूस आंबा पाठवला असल्याचेही त्यांनी माहिती दिली. आज कोकणातील शेतकरी दलालीला भिक न घालता थेट परदेशातील बाजारपेठ आपला माल पाठवत आहे हे निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news