Fishing Season Begins: हिरवा झेंडा अन् नौका समुद्राकडे रवाना; देवगडमध्ये मासेमारी हंगामाचा श्रीगणेशा

मत्स्यसाठ्याचे संवर्धन आणि भविष्यातील उत्पादन वाढीसाठी १५ दिवसांची वाढीव मासेमारी बंदी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता
Fishing Season
Fishing Season
Published on
Updated on

देवगड : ७६ दिवसांच्या मासेमारी बंदीनंतर अखेर आज देवगड येथील समुद्रात मासेमारी हंगामाला अधिकृतपणे सुरुवात झाली. देवगड धक्क्यावर सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत नौका मालक, मच्छिमार, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे कर्मचारी आणि सागरी सुरक्षा रक्षक यांच्या उपस्थितीत मासेमारी नौकांना हिरवा झेंडा दाखवून समुद्रात रवाना करण्यात आले.

Fishing Season
Vasai Fishing Season: मासेमारी हंगामासाठी मच्छीमारांची लगबग

यावेळी मासेमारी नौकांची विधिवत पूजा करून परिक्रमा करण्यात आली. उपस्थित नौका मालक आणि मच्छिमार बांधवांना पुष्प देऊन नव्या मासेमारी हंगामासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. हिरवा झेंडा दाखविल्यानंतर टप्प्याटप्प्याने नौका समुद्राच्या दिशेने रवाना झाल्या.

मासेमारी बंदी संपल्यानंतर मच्छिमार बांधवांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. दीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा समुद्रात जाण्याची संधी मिळाल्याने मच्छिमारांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून येत होता. देवगडसह परिसरातील अनेक कुटुंबांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असल्याने हंगामाच्या सुरुवातीने सागरी पट्ट्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Fishing Season
Murud Fishing Season: मुरुडच्या खोल समुद्रातील मासेमारीला सुरवात

दरम्यान, मत्स्यसाठ्याचे संवर्धन आणि भविष्यातील उत्पादन वाढीसाठी १५ दिवसांची वाढीव मासेमारी बंदी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे समुद्रातील मत्स्यसाठ्याला वाढीसाठी अधिक वेळ मिळाल्याने आगामी काळात चांगले मत्स्य उत्पादन मिळण्याची अपेक्षा मच्छिमारांकडून व्यक्त करण्यात आली. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या या निर्णयाचे स्थानिक मच्छिमारांनी स्वागत केले.

यावेळी अंमलबजावणी अधिकारी किरण वाघमारे यांनी सर्व नौका मालक व मच्छिमारांना शुभेच्छा देत कायद्याचे पालन करून तसेच सागरी सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करत मासेमारी करण्याचे आवाहन केले. सुरक्षितपणे मासेमारी करून सर्वांना चांगले मत्स्य उत्पादन मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Fishing Season
Goa Fishing Season | "गोव्यात उद्यापासून मासेमारी हंगामाला सुरुवात! मजुरांची कमतरता अन् डिझेल व्हॅट परताव्यावरून मच्छीमार चिंतेत"

सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांनी विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) मासेमारी करणाऱ्या नौकांनी संबंधित नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. विशेष आर्थिक क्षेत्रात मासेमारी करण्यासाठी आवश्यक पास असलेल्या नौकांनीच त्या क्षेत्रात मासेमारी करावी. तसेच ज्या नौका विशेष आर्थिक क्षेत्रात मासेमारी करणार आहेत, त्यांनी आवश्यक पास घेऊनच समुद्रात उतरावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आजपासून टप्प्याटप्प्याने नौका समुद्रात जात असून नारळी पौर्णिमेपर्यंत सर्व नौका मासेमारीसाठी समुद्रात दाखल होतील, अशी माहिती देण्यात आली. सुरक्षितता, शिस्त आणि शाश्वत मासेमारीचा संदेश देत देवगडचा मासेमारी हंगाम उत्साहात सुरू झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news