Sindhudurg News : खाडीपात्रात वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला

मुलाच्या निधनानंतर मानसिक स्थिती बिघडल्याची माहिती; देवगड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
Sindhudurg News : खाडीपात्रात वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला
Published on
Updated on

देवगड : देवगड तालुक्यातील गोवळ गावठणवाडी येथील ७७ वर्षीय अनिता बाळकृष्ण घाडी यांचा मृतदेह रविवारी (दि. २०) दुपारी एकच्या सुमारास वानिवडे-बांधकरवाडी येथील खाडीपात्रात आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता घाडी यांना दोन मुलगे आहेत. त्यापैकी एका मुलाचे ऑक्टोबर २०२५ मध्ये निधन झाले होते. त्यानंतर त्यांची मानसिक स्थिती बिघडली होती, अशी माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. दरम्यान, शनिवारी दुपारी एकच्या सुमारास अनिता घाडी घरातील कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडल्या. त्या उशिरापर्यंत घरी परतल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा परिसरात शोध घेतला; मात्र त्या आढळून आल्या नाहीत.

रविवारी दुपारी वानिवडे पोलीस पाटील गुरुनाथ वाडेकर यांना बांधकरवाडी येथील खाडीपात्रात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यांनी याबाबत देवगड पोलिसांना माहिती दिली. तसेच सोशल मीडियावर घटनेची माहिती आणि मृत महिलेचा फोटो प्रसारित केला. ही माहिती घाडी कुटुंबीयांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृतदेह अनिता घाडी यांचा असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर देवगडचे पोलीस उपनिरीक्षक संदीप खाडे आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला.

याप्रकरणी अनिता घाडी यांचा मोठा मुलगा तुषार बाळकृष्ण घाडी (३०) यांनी देवगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार आशिष कदम करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news