Sindhudurg |सावंतवाडी रेल्वे स्टेशनचा 'अमृत भारत' मधून विकास करा

खा. नरेश मस्के यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी
Sindhudurg
Sindhudurg railway station file photo
Published on
Updated on

मळगाव : कोकणातील सावंतवाडी हे एक प्रमुख पर्यटन आणि सांस्कृतिक केंद्र आहे. त्यामुळे केंद्र शासनाने 'अमृत भारत स्टेशन योजना' (ABSS) मधून सावंतवाडी रेल्वे स्टेशनचा विकास करावा, अशी मागणी खा. नरेश मस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे लेखी निवेद‌नाद्वारे केली आहे.

आगामी गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेशात (MMR) राहणाऱ्या लाखो कोकण बाकरमान्यांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी शिवसेना खा. नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी आणि गाड्‌यांची कमतरता या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले आहे. गणेशोत्सवासारख्या महासणात नियमित गाड्यांवरील प्रचंड ताण आणि अपुऱ्या सुविधांमुळे चाकरमान्यांचे होणारे हाल थांबवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Sindhudurg
Senior Citizen Falls Victim to Cyber Scam -दोडामार्गातील वृद्धाला १ लाख ९४ हजारांचा ऑनलाईन गंडा

पत्रात खा. म्हस्के यांनी ठाणे रेल्वे स्थानकावरील अपुऱ्या तिकिट खिडक्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. ठाणे हे संपूर्ण महाराष्ट्रातील महत्वाचे आणि मध्यवर्ती स्थानक असून येथून दररोज हजारो कोकणवासी प्रवास करतात. मात्र, या ठिकाणी रिझर्वेशन तिकिटांसाठी काउंटस्ची संख्या अपुरी असल्याने प्रवाशांना प्रवंड त्रास सहन करावा लागत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी ठाणे स्टेशनवर किमान दोन अतिरिक्त रिझर्वेशन काउंटर सुरू करून तिथे समर्पित कर्मचारी नेमावेत, तसेच सणासुदीच्या काळात तिकिटांचा काळाबाजार (ब्लॅक मार्केटिंग) रोखण्यासाठी आरपीएफ व पोलिसांची विशेष नाकेबंदी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी (मुंबई विभाग) यांनी दिलेल्या निवेदनाचा संदर्भ जोडत खा. म्हस्के यांनी ठाणे - सावंतवाडी दरम्यान 'धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस' ही विशेष वंदे भारत दर्जाची रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. ही ट्रेन सावंतवाडी येथेच समाप्त (टर्मिनेट) केल्यास इतर राज्यांतील पर्यटकांच्या दबावापासून मुक्त राहून १०० टक्के आरक्षण कोटा स्थानिक कोकणवासीयांना उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Sindhudurg
कोकण विधान परिषद निवडणूक : सहाही उमेदवारांची १२ नामनिर्देशन पत्रे वैध

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या प्रलंबित पायाभूत सुविधांचा विकास करण्यावरही खासदारांनी पत्रात विशेष भर दिला आहे. टर्मिनसच्या पहिल्या चरणाचे काम पूर्ण झाले असले तरी स्वतंत्र ट्रेन संचालनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला 'चरण २' (Phase 2) अद्याप रखडलेला आहे. या रखडलेल्या कामात टर्मिनसची प्रशासकीय इमारत आणि ट्रेनमध्ये पाणी भरण्याची व्यवस्था समाविष्ट आहे. ही कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी आदेश द्यावेत, तसेच भविष्यातील क्षमता पाहता येथे किमान एक अतिरिक्त प्लॅटफॉर्म आणि एक स्टॅबलिंग लाईनचे निर्माण करण्यात यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. हा प्रकल्प 'पीएम गती शक्ती नॅशनल मास्टर प्लान PMGS- NMP) शी जोडण्याची मागणीही त्यांनी केली.

सावंतवाडी हे एक प्रमुख पर्यटन आणि सांस्कृतिक केंद्र असूनही या स्टेशनला 'अमृत भारत स्टेशन योजना' (ABSS) मधून अप्रत्याशितपणे बाहेर ठेवण्यात आले आहे. देशभरातील रेल्वे स्थानकांचा कायापालट करणाऱ्या या योजनेत सावंतवाडीचा तातडीने समावेश करण्यात यावा, असे म्हस्के यांनी पत्रात म्हटले आहे. या मागणीला बळ देण्यासाठी त्यांनी माहितीच्या अधिकाराचा (RTI) हवाला दिला आहे. सावंतवाडी स्टेशन दररोज सुमारे १४ लाख ८८ हजार २२० रू. एवढा मोठा तिकिट महसूल रेल्वेला मिळवून देते. विशेष म्हणजे, यातील २५ टक्के पेक्षा जास्त महसूल ५०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा प्रवास करणाऱ्या दीर्घ पल्ल्याच्या प्रवाशांकडून येतो, ज्यामुळे या स्टेशनची व्यावसायिक व्यवहार्यता सिद्ध होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news