

सावंतवाडी ः महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी शहरातून प्रचार फेरी काढून प्रचाराची सांगता केली. यावेळी शिवसेना, भाजप, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय रामदास आठवले गट महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या कार्यालयाकडून शहरात प्रचार फेरी निघाली.
माजी नगराध्यक्ष संजू परब, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाध्यक्षा अॅड. नीता सावंत -कविटकर, मनोज नाईक, अजय गोंदावळे, राजन पोकळे, सुरेश गवस, उदय भोसले, बाबू कुडतरकर, विनोद सावंत, देव्या सूर्याजी यांच्यासह महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.(Maharashtra assembly polls)