Sindhudurg News : चिवला बीचवर मृत ऑलिव्ह रिडले कासव

वनविभागाकडून पंचनामा करून विल्हेवाट
Sindhudurg News
चिवला बीचवर मृत ऑलिव्ह रिडले कासव
Published on
Updated on

मालवण : येथील प्रसिद्ध चिवला बीचवर एक ऑलिव्ह रिडले जातीचे कासव मृतावस्थेत आढळून आले. स्थानिकांनी ही बाब तातडीने प्राणीप्रेमी शिल्पा खोत यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर वनविभागाच्या मदतीने या कासवावर रीतसर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चिवला बीच परिसरात फिरणाऱ्या स्थानिकांना समुद्रकिनारी एक कासव मृतावस्थेत पडलेले दिसले. स्थानिकांनी तातडीने याची माहिती प्राणीप्रेमी शिल्पा खोत यांना दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून खोत यांनी तत्काळ कांदळवन वनविभागाशी संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली.कांदळवन वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कासवाचा रीतसर पंचनामा करण्यात आला आणि त्यानंतर त्याला सुरक्षितरीत्या पुरण्यात आले. यावेळी कांदळवन परिमंडळ वनाधिकारी एस. ए. सुतार, वनमजूर रमाकांत मांजरेकर, नीतेश गितये उपस्थित होते. समुद्रकिनाऱ्यावर अशा प्रकारे दुर्मिळ कासव मृत आढळल्याने सागरी जीवांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा सुरू झाली आहे. वनविभागाने स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना अशा घटना आढळल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news