Crocodile Spotted Sawantwadi | सावंतवाडी मोती तलावात मगरीचे पुन्हा दर्शन

Forest Department Failed | वनविभागची पकड मोहीम अयशस्वी
Crocodile Spotted Sawantwadi
सावंतवाडी येथील मोती तलावात पुन्हा मगरीने दर्शन दिले आहे.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक मोती तलावात निदर्शनास येत असलेल्या मगरीला पकडण्यासाठी वनविभागाने ‘सापळा’ लावला. मात्र तिला पकडण्यात वनविभागाला अपयश आले. रविवारी पुन्हा एकदा मगरीने त्याच संगीत कारंजावर येऊन बसत दर्शन दिले आहे.

ही मगर या सापळ्यात अडकेल अस वाटले होते. मात्र, त्यात वनविभागाला यश आले नाही. रविवार दुपारी 12.30 वा. च्या सुमारास या मगरीने पुन्हा दर्शन देत आपले अस्तित्व दाखवलेे. काही दिवसांपूर्वी वनविभागाच्या जलद कृती दलाकडून तलावात बोटीच्या सहाय्याने पाहणी करण्यात आली होती. मात्र, त्यांना तलावात कोठेही मगरीचे वास्तव्य आढळून आले नाही.

Crocodile Spotted Sawantwadi
Sawantwadi Moti Lake Crocodiles | सावंतवाडी मोती तलावात दोन महाकाय मगरी

तिने पुन्हा एकदा संगीत कारंजावर बसत आपले अस्तित्व दाखवले आहे. ही मगर वनविभागाच्या सापळ्यात कैद न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरातील बहुतांश गणपतींचे विसर्जन मोती तलावात याच ठिकाणी केले जाते. अशावेळी मगरींपासून कोणाला धोका पोहोचू नये यासाठी वनविभागाकडून खबरदारी घेण्यात यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. या मगरीला जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news