

मळगाव : वेंगुर्ले व सावंतवाडी तालुक्यात गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे. हा पाऊस असाच सुरू राहिल्यास हाता तोंडावर आलेले भातपीक वाया जाण्याची भीती आहे. वेंगुर्ले व सावंतवाडी तालुक्यात गेले दोन दिवस संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत, त्यात पुराचे पाणी भातशेतीत घुसून शेती पाण्याखाली जाण्याची भीती आहे.
शेतकर्यांनी पावसाळी हंगामासाठी जूनमध्ये केलेली पेरणी आणि भात लावणी बहरात आली आहे. जूनपासून भात पिकासाठी समाधानकारक पाऊस असल्यामुळे शेतकर्यांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे. आता भातात दाणे भरायला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत गेले दोन दिवस पावसाचा फटका शेतकर्यांच्या भात शेतीला बसण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहेत.