Central Railway adds special trains for Ganesh festival- गणपती उत्सवासाठी मध्य रेल्वेकडून 'कोरे' मार्गावर जादा गाड्या

मुंबई-मडगाव दरम्यान ४ अतिरिक्त विशेष गाड्यांची घोषणा
railway
railwayfile photo
Published on
Updated on

सावंतवाडी : आगामी गणेशोत्सव पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई आणि मडगाव दरम्यान ४ अतिरिक्त 'गणपती विशेष गाड्या' चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

विशेष गाड्यांचे वेळापत्रक व सेवाः

गाडी क्रमांक ०१००७ (CSMT ते मडगाव): ही गाडी शुक्रवारी ११ सप्टेंबर आणि रविवारी १३ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून मध्यरात्री ००:४० वा. सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५:३० वा. ती मडगाव येथे पोहोचेल (एकूण २ सेवा). गाडी क्रमांक ०१००८ (मडगाव-CSMT): ही गाडी शुक्रवारी ११ सप्टेंबर आणि रविवारी १३ सप्टेंबर रोजी मडगाव येथून दुपारी १६:३० वा. सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:१५ वा. पोहोचेल (एकूण २ सेवा).

गाडीचा मार्ग आणि महत्त्वाचे थांबेः

या विशेष गाडीला कोकण मार्गावरील दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

गाडीची संरचना आणि डबेः

या ट्रेनमध्ये २ वातानुकूलित तृतीय (3-Tier AC), १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह द्वितीय आसन क्षमतेचे डबे समाविष्ट असतील.

आजपासून आरक्षण सुरू

गाडी क्रमांक ०१००७ साठीचे बुकिंग शनिवार २९ ऑगस्ट पासून सर्व संगणकीय आरक्षण (PRS) केंद्रांवर तसेच IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावर (www.irctc.co.in) सुरू होईल. अनारक्षित डब्यांसाठीचे बुकिंग UTS प्रणालीद्वारे किंवा रेलवन अॅप' (Rail One App) वरून करता येईल. या गाड्यांच्या सर्व थांब्यांच्या सविस्तर वेळापत्रकासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES ॲपचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news