महामोर्चाच्या पूर्वतयारीसाठी सावंतवाडीत बौद्ध संघटना कार्यकर्त्यांची बैठक

Mahamorcha preparation: मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
Buddhist organization meeting
कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना विद्याधर कदम. बाजूस अन्य मान्यवर.pudhari photo
Published on
Updated on

सावंतवाडी ः भगवान गौतम बुद्धांना दुःखमुक्तीचे दिव्य ज्ञान प्राप्त झाले ते बोधगया येथील महाविहार हे जगभरातील बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान आणि अस्मिता असणारे एकमेव ठिकाण आहे. मात्र, या विहारावर होणारे अन्य धर्मियांचे अतिक्रमण हे बौद्ध संस्कृतीवर होणारे अतिक्रमण आहे. यात मोठे षड्यंत्र असून हे षड्यंत्र मोडून महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी बौद्धांची एकजूट महत्वाची असल्याने बौद्ध बांधवांनी 28 एप्रिल रोजी आयोजित केलेल्या विराट बौद्धांच्या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन द बुद्धिस्ट फेडरेशनचे निमंत्रक विद्याधर कदम यांनी केले.

बोधगया येथील जगप्रसिद्ध बौद्ध तीर्थस्थान असलेले महाविहार हे गेली अनेक वर्ष इतर धर्मियांच्या ताब्यात आहे. हे महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी जगभर गेले अनेक वर्ष आंदोलने सुरू आहेत. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 28 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर बुद्धिस्ट फेडरेशनच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व बौद्ध संघटनांचा संयुक्त विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चाची जनजागृती करण्यासाठी रविवारी सावंतवाडी येथील आंबेडकर समाज मंदिर सभागृहात तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री.कदम मार्गदर्शन करताना बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्हा बौद्ध सेवा संघ अध्यक्ष संदीप कदम, मालवण तालुका बौद्ध सेवा संघ सचिव आनंद किर्लोस्कर ,भारतीय बौद्ध महासभा जिल्हा चिटणीस आनंद धामापूरकर, प्रवक्ते आनंद कदम आदी उपस्थित होते.

प्रेरणाभूमीचे सचिव मोहन जाधव यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. विद्याधर कदम यांनी जिल्ह्यात मोठ्या संख्येने असणारा बौद्ध समाज विविध संघटनात विखुरलेला असला तरी या मोर्चाच्या माध्यमातून सर्व संघटना एकत्रित झाल्याचे सांगून जिल्ह्यात आपली ताकद, शक्ती संघटन, दाखवण्याची ही संधी असल्याचे सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते संदीप कदम यांनी देशातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वातावरण याची माहिती देत देशाचे संविधान बदलण्याची प्रक्रिया सुरू असून बौद्ध समाजाच अशा प्रवृत्तींना रोखू शकतो, यासाठी या मोर्चाच्या माध्यमातून आपली ताकद दाखवा, असे आवाहन केले . आनंद धामापूरकर यांनी आभार मानले. सावंतवाडी तालुक्यातील कार्यकर्ते सर्वश्री वासुदेव जाधव, सगुण जाधव, मोहन जाधव, कांता जाधव, परशुराम जाधव, सुरेश जाधव, तिळाजी जाधव, ममता जाधव, सुनील जाधव, चंद्रकांत जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news