

नांदगाव : तळेरे-विजयदुर्ग राज्यमार्गावर फणसगाव-बांबरवाडी येथील धोकादायक वळणावर बोअरवेल ट्रक व मोटारसायकल यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले. या अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेे. मंगळवारी स. 11.30 वा. च्या सुमारास हा अपघात झाला.
मोटारसायकल घेऊन गौरव नूतन वातकर, पार्थ राघोबा भोगले (दोघे रा. तळेरे) हे फणसगाव येथे तळेरेकडे येत होते. मार्गावर बांबरवाडी येथील धोकादायक वळणावर त्यांच्या मोटरसायकलची सामोरून येणार्या बोअरवेल ट्रकला धडक झाली. अपघातानंतर दुचाकी स्वार दोघेही रस्त्यावर पडल्याने दोघांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस हवालदार गणेश भोंवड, फणसगाव ग्रा. पं. सदस्य बाबू आडीवरेकर, विठ्ठलादेवी पोलिसपाटील स्वप्नील नारकर, फणसगाव पोलिसपाटील अविनाश पाटील, दिनकर नारकर यांनी धाव घेत दोन्ही जखमींना रिक्षा चालक संतोष नारकर याच्या रिक्षातून कणकवली खाजगी रुग्णालयात दाखल केले.
यातील गौरव वातकर याच्या डोक्याला व पार्थ भोगले याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.