

सावंतवाडी : तालुक्यात कामासाठी आलेल्या परप्रांतीय कामगार महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील दुसरा फरार साथीदार संशयित विकेंदर सिंग (वय 25, रा. झारखंड) याला पोलिसांनी तीन दिवसांनी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथून ताब्यात घेतले. पोलीस कोठडीत असलेल्या थॉमस बा याच्याही कोठडीची मुदत संपल्याने दोघांना मंगळवारी येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
यातील संशयित याने तालुक्यात खाणीवर कामासाठी आलेल्या परप्रांतीय महिलेवर अत्याचार करणार्या थॉमस बा या कामगाराला मदत केली होती. त्यावरून दोघांवर अत्याचार प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले होते. यातील प्रथम संशयित थॉमस बा याला गोव्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते तर दुसरा संशयित विकेंदर सिंग हा चार दिवस फरार होता त्याच्या मागावर सावंतवाडी पोलिसांचे पथक होते.
अखेर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे संशयित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून त्याला पथकाने पाठलाग करून ताब्यात घेतले. संशयित सिंग व थॉमस बा या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केला असता प्रत्येकी दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. गुन्ह्याचा काही दिवसातच सावंतवाडी पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या.
सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक, मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सौ माधुरी मुळीक, पोलिस हवालदार प्रवीण वालावलकर, पो मंगेश शिंगाडे, पो गौरव परब यांचच्या पथकाने ही धडक कारवाई केली.