भुईबावडा घाट 29 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहतूकीस बंद

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांचे आदेश
Bhuibawda Ghat closed for heavy traffic till September 29
भुईबावडा घाट 29 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहतूकीस बंदpudhari photo
Published on: 
Updated on: 

वैभववाडी :  भुईबावडा घाटात सोमवारी (दि.23) सायंकाळी झालेल्या ढग फुटीने घाट रस्त्यांची दैना उडाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घाटातील दरडी हाटविण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंगळवारी (दि.24) सायंकाळपासून हलकी वाहतूक सूरू करण्यात आली आहे. मात्र मोरीचा पाईप वाहून गेल्यामुळे रस्त्याला भगदाड पडल्यामुळे घाटातून एसटी बससह अवजड वाहतूक 24 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सदर मार्गावरून हलक्या वाहनांची वाहतूक चालू राहील.असे या बद्दलचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. करूळ घाटही बंद असल्यामुळे या घाटातील वाहतूक फोंडाघाट व अनुस्कुरा घाट मार्गे वळवण्यात आली आहे.

Bhuibawda Ghat closed for heavy traffic till September 29
पावसाच्या पाण्याने उदगावात बायपास महामार्ग बंद, जयसिंगपुरात वाहतूक कोंडी

 घाटातील संरक्षक भिंतीच्या बाजूचा रस्त्याचा काही पृष्ठभाग मातीच्या भरावासह पूर्णतः वाहून गेला आहे. त्यामुळे रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे.  मोऱ्याच्या ठिकाणी असलेल्या दोन रांगांच्या  पाईपपैकी एका रांगेचे पाईप काही भागात तुटून वाहून गेले असून हेडवॉल पूर्णपणे पडली आहे. या भागात आजही पाऊस सुरू असून पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून जात आहे. मोरीच्या वरील बाजूला मोठ्या प्रमाणात दगड मातीचा ढीग जमा झाला आहे. रस्त्याचा पृष्ठभाग अस्तित्वात सुमारे २.७० मी. इतक्या रुंदीचा राहिला असल्याने या भागातून मोठी वाहने जाणे अपघाताला कारण ठरु शकण्याची शक्यता असल्याने सद्यस्थितीत या भागातून (घाटरस्त्यामधून) केवळ हलक्या स्वरूपाच्या प्रवासी वाहतूकीला परवानगी देऊन इतर वाहतूक फोंडाघाट मार्गे अथवा अनुस्कुरा घाट मार्गे वळविणेबाबत विनंती केलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news
ताज्या बातम्या