Sindhudurg News : भुईबावडा घाटातील कमान कोसळली; वाहतूक विस्कळीत

सुदैवाने कोणीही जखमी नाही
Sindhudurg News
भुईबावडा घाटातील कमान कोसळली; वाहतूक विस्कळीत
Published on
Updated on

वैभववाडी : भुईबावडा घाटातील कमान कोसल्यामुळे गगनबावडा-खारेपाटण मार्गांवरील वाहतूक काहीवेळ विस्कळीत झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली.

वैभववाडी तालुक्यात सध्या पावसाचा जोर आहे. विशेषतः सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर अधिक आहे. या पावसाने गगनबावड्यापासून काही अंतरावर घाटाच्या प्रवेश द्वारावर उभारलेली लोखंडी कमान अचानक कोसळली. सुदैवाने यादरम्यान कोणतेही वाहन तिथून जात नव्हते, त्यामुळे अनर्थ टळला.

कमान कोसळल्याची माहिती मिळताच गगनबावडा पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक श्री. पाटील, कॉन्स्टेबल दिगंबर पाटील, मारुती खांडेकर, विशाल माळवी, सतीश पाटील तसेच बांधकामचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहन चालक, प्रवासी व स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने कमान बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news